कार्पोरेट संस्कूतीचे पूजक..? लोकशाहीत विचारांची लढाई
विचारानेच लढावी असा अलिखित संकेत आहे,नैतिकता आहे.सर्व मित्रांनी वैयक्तिक मते मांडतानाच संवैधानिक मांडणी केली तर बरे म्हणजे जेव्हा मला वाटते की माझे बरोबर आहे तेव्हा समोरचाही त्यांच्या मताप्रमाणे मी योग्यआहे असेच मानतो त्यात काही वावगे नाही पण माझे ते खरे म्हणण्यांची अनाठायी वूत्ती अनेकदा आक्रस्ताळेपणा ठरू शकतो.तेव्हा खरे ते माझे म्हणण्याची समज सर्वांना येवो अशी प्रार्थना आपण करूया.
आपण ज्या रंगाचा चष्मा तसे समोरचे अवकाश दिसते.पण प्रत्येक क्षेत्रात काय नवनवीन बदल होत आहेत हे अभ्यासणे फार गरजेचे आहे.अभ्यासे प्रसवावे हे भान प्रत्येकास येणे फार गरजेचे आहे.कोणाचाही द्वेष करत राहण्यापेक्षा काय नवे बदल यावेत,येत आहेत हे अभ्यासणे औचित्याच राहील.त्यामुळे समाजभान नि जीवनमानात काय सुधारणा होत आहेत हे पाहणे हा खूप आनंददायी प्रवास ठरू शकतो.महाराष्ट्राला फुले, शाहू,आंबेडकरी विचारांचा मोठा वारसा आहे.त्यात संविधानकार बाबासाहेब आंबेडकर तर महान पत्रकार होते.संविधानकारांनी सच्चाई भरडली जाऊ नये याची सजगता संविधानात बाळगली आहे.गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीस गुन्हेगार म्हणता येत नाही.तसेच कोणाचाही आवाज नाहक चिरडता येत नाही.दमण संस्कूतीच्या विरोधात सर्वोदयींनी एकीने उभे राहणे अपेक्षित आहे.
लोकपत्र दैनिकात काल एक वादग्रत अग्रलेख लिहिला गेला.लोकपत्रचे कार्यकारी संपादक मा रविंद्र तहकिक आपला आवाज उठवत शिक्षकांच्या विरोधात गरळ आेकत गेले.संपूर्ण अग्रलेख सर्वांनी वाचावा ही विनंती.मा संपादकांची अक्षरलढाई आममाणसांकरता किंवा सार्वजनिक असते म्हणजेच सर्वांसाठी असते.शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरता सामूहिक सार्वत्रिक प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा करणारी मांडणी बाब स्वागतार्ह आहे.त्यात धोरणात्मक बदल व्हावेत ही बाब फार महत्वाची आहे.आता कुठे२०२०च्या नव्या शैक्षणिक धोरणात एकूण राष्ट्रीय जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर होणार आहे.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीअसं तुकोबांनी दूरदर्शीपणे लिहिले आहे.सर्व ढासाळलेल्या नि ढेपाळलेल्या व्यवस्थेचं खापर फक्त शिक्षकांच्या माथी मारण्याची विचारधारा डोके वर काढते आहे.जसे काम करणारयाचे काळानुसार मोल कमी झाले तसंच शिक्षण यंत्रणेत शिक्षकांवर नियंत्रण ठेवणारयांचचे विनाकारण महत्त्व वाढत राहिले. शिक्षक कुठे कोणाचा हात धरून भ्रष्टाचार करायला शिकवतात का?याउलट आपणच आपल्या सोयीकरता राजकारण्यांच्या पाठीशी उभे राहतो.राजकारण्यांनीच अप्रत्यक्षरित्या शहरीकरणाचा वेग वाढवून अराजक वाढविले आहे. वर्तमानपत्रांचे संपादकीय वाचणारया वाचक वर्गात शिक्षक मोठया प्रमाणात होते,आहेत.सार्वजनिक जीवनात खूप मोठे बदल काळानुरूप होत गेले,शहरीकरणाचा वेग वाढला.जागतिकीकरणात प्रत्येकाची जागा अस्थिर झाली आहे कारण स्पर्धा वाढली आहे.जसे संपादक बदलले,तसे शिक्षकही बदलले.तसं पाहिले तर दोघांचही काम समांतर आहे.शिक्षकांनी उत्तम संस्कार करावेत नि संपादकांनी वा पत्रपंडितांनी दूरदर्शीपणा समाजाला दयावा असं अपेक्षितच आहे.परंतु इतरांप्रमाणेच संपादकही शिक्षकांचा दुस्वास करू लागले आहेत याचेच हे ताजे उदाहरण म्हणता येईल.
संपादकांनी शिक्षकांच्या किंवा शिक्षकांनी संपादकांच्या विरोधात उभे राहणे हे फार वाईट वळण माझ्यासारख्यांना पाहणे कठीण आहे कारण शिक्षकांनी मला सामाजिक भान दिले तसंच संपादकांनी जागतिक जाणही दिलीे आहे.छोटया छोटया कूतीत विकासाची ऊर्जा गमावणे ही बाब परवडणारी आहे असं मला वाटत नाही.स्वातंत्र्याची फळे सामान्य माणसाला मिळावेत याकरिता सर्व लढवय्याचं ,सैनानींचं संघटन ही काळाची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते. लोकपत्रचे संपादक मा रविंद्र तहकिक साहेबांना काय झाले की त्यांनी एवढे घसरावे?का एकेरीवर आले?सन्मानपूर्वक लिहिण्याचे भान का उरू नये याचे खूप वाईट वाटते.विषय खूप छोटा होता..शिक्षकांना सुटया वाढवून मिळाव्यात अशी मागणी आ कपिल पाटील यांनी केली होती.
मा रविंद्र तहकिक असे काही भडकले की त्यांनी स्वत:च्या अंगावर शिक्षक संघटनांचा रोषओढवून घेतला आहे.न्याय मागण्या मांडणे हा गुन्हा आहे का?शिक्षकांनी कसं जगावं याचा रिमोट यांच्या हाती दयावा का?बरं !एकेकाळी कपिल पाटीलही एका दैनिकांचे संपादक होते याचं तरी भान तरी ठेवावं?सोबतच सर्व शिक्षकांना आरोपीच्या पिंजरयात उभे केले.करोडोंचे भ्रष्टाचार होतात,लोकांच्या घामाचे पैसे लुटले जात आहेत.यंत्रणेला हातांशी सत्ताधारी करोडपती बनत आहेत तेव्हा व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याची खरी गरज असते.महागाई निर्देशांकानुसारचा शिक्षकांचा पगार काहींना का सलतो हेच कळत नाही.सरकार खाजगीकरणाचा पुरस्कार करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचीही जबाबदारी टाळत असतानाच करोनाची टाळेबंदी आली.शासकीय यंत्रणांनी अत्यावश्यक सेवेच्या नावाने नको तिथे शिक्षकांना जुंपले.आपले शिक्षक राष्ट्रीय कामास कधीच नाही म्हणाले नाहीत की म्हणणार नाहीत.अनेक शिक्षक कामांप्रती निष्ठेने शहीद झाले आहेत.
अदयापही शिक्षकांना करोना विमा कवच मिळाले नाही वा वैदयकीय परिपूर्ती मिळावी ही मागणी प्रलंबित आहे.करोना काळात सढळ हाताने मदत करण्यात शिक्षकच आघाडीवर होते,आहेत हे योगदान कोणासही नाकारता येणार नाही .करोना महामारीच्या महाकठीण काळातही तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने महाराष्ट्रात शिक्षणाचा जागर कायम राहिला.शाळा बंद असून शिक्षण सुरू राहिले.यापुढील काळातही महाराष्ट्राच्या खेडोपाडयांतील सरकारी डिजीटल शाळा नवोन्मेषांने बहरत राहणार आहेत.शिक्षक बंधुभगिनींनी स्वखिशातून शाळेकरता खर्च करायला कधी हात आखडता घेतला नाही की यापुढे घेणार नाहीत,तसे महाराष्ट्रातले सरळमार्गी शिक्षक हेच महाराष्ट्राची भाग्यरेषा आहेत हे माझ्या महाराष्ट्र देशास मी विनम्रपणे सांगू इच्छितो.
बळी आंबुलगेकर,नांदेड