आज डॉ.सलीम अली जयंती निमित्त लोहयात पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन

लोहा/प्रतिनिधी
पद्मविभूषण थोर पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त आज दि.१२ नोव्हेंबर रोज गुरूवारी रामाची वाडी तलाव , मंगरूळ तलाव येथे पक्षी निरिक्षण करण्यात येत आहेत. यावेळी सुरक्षित अंतर ठेवून शेतकरी ,विद्यार्थ्यांना पक्ष्याची माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलिस वाडीचे सरपंच पिराजी धुळगंडे ,वंचित आघाडीचे धीरज हाके मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पक्षीमित्रांच्या मुलाखती व पक्ष्यांप्रती कार्य करणाऱ्यांचे माहिती संकलन होईल. पक्षीतज्ज्ञ शिवाजी आंबुलगेकर , संजय कोंपलवार , धनंजय गुटे, बापू गायखर , सदा वडजे , राहुल जवळगे , संतोष परबत, सुनील कदम, रंगनाथ तेलंग, गोविंद बाजगीर, आदींचा समावेश आहे. आपणही सहभागी व्हावे असे आवाहन संस्थे कडून करण्यात आले आहे.

****** Advt.****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *