लोहा( प्रतिनिधी)
लोहा तालुक्यातील कापसी (बु) प्राथमिक आरोग्य केंद्राला नूतन रुग्णवाहिका खरेदीसाठी ग्रामविकास विभागाने दिनांक 6 नोव्हेंबर 2020 च्या पत्रकान्वये मंजुरी दिली आहे.
कापसी( बु) या ग्रामपंचायत कडील 14 व्या वित्त आयोगाच्या शिल्लक 10. 50 लक्ष अखर्चिक निधीतून कोरोनाविषाणू महामारी च्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी( बु) साठी नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी देण्याची मागणी लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी च्या पत्रान्वये ग्राम विकास मंत्री यांच्याकडे करून वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता ,सदरील नूतन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्या दि. 3 एप्रिल 2020 च्या पत्रकान्वये covid-19 च्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत निर्देश देण्यात आले आहेत, या अगोदरही लोहा ,कंधार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कोरोनाच्या संकटात लोहा व कंधार रुग्णालयाला 32 लाख रुपयांचा निधी रुग्णवाहिका खरेदीसाठी उपलब्ध केला होता व सध्या कंधार व लोहा येथील रुग्णालयाला दोन नूतन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत, आमदार शामसुंदर शिंदे यांनी कोरोना महामारीत रुग्णवाहिका खरेदी व लॉक डाऊन मध्ये परराज्यात अडकलेल्या मतदारसंघातील हजारो नागरिकांना दिलासा दिला होता.
कोरोना महामारीत आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे यांनी लोहा व कंधार मतदार संघात सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांना सॅनिटायझर व मास्क चे वाटप, अन्नधान्य किट व जेवनाचे वाटप मतदार संघातील गावे ,वाडी तांड्यावर केले होते, आमदार शामसुंदर शिंदे दाम्पत्यांनी कोरोना काळात मतदारसंघातील वाडी, तांड्यावर जाऊन ग्राउंड लेव्हलवर काम केले होते, तेव्हा आमदार शिंदे दाम्पत्यांना कोरोणाची बाधा झालेली होती. कापशी प्राथमिक आरोग्य केंद्राला नूतन रुग्णवाहिका खरेदीस शासनाने मंजुरी दिल्याने आमदार शामसुंदर शिंदे यांच्या वेळोवेळीच्या प्रयत्नाला यश आले असून कापसी येथील नागरिकातून आमदार शामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.