लोहा / प्रतिनिधी
रब्बी हंगामासाठी लिंबोटी व विष्णूपूरी धरणाचे पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी शेतकरी मित्र साहेबराव पाटील काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले की, सद्या लोहा तालुक्यातील शेतकरी गहूं, हरभरा,टाळकी,करडी,आदी खरीप पिकांची पेरणी करीत आहे खरीप हंगामासाठी सुरुवातीला पिकासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लिंबोटी व विष्णूपूरी धरणातील पाण्याच्या आठ पाळ्या वेळेवर सोडाव्यात
सदा सध्या लोहा तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात खरीप पिकांची पेरणी करीत आहेत त्यामुळे आता तात्काळ खरीप हंगामासाठी लिंबोटी व विष्णूपूरी धरणातील पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी मित्र साहेबराव पाटील काळे यांनी केली आहे.
*****Advt,*****