आणीबाणीतील वीर सत्याग्रहींचे राज्य शासनाने बंद केलेले मानधन पुर्ववत करण्यासाठी पेन्शनधारकांची डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्याकडे धावा …

कंधार ;दत्तात्रय एमेकर 

तत्कालीन पंतप्रधान स्व.श्रीमती इंदिराजी गांधी यांनी लादलेल्या जाचक आणीबाणीला विरोध केल्याने अनेकांना  महीनो गणती एक महिने तर कुणी दोन/तीन महिन्याचा  काळ तुरुगवास भोगावा लागला होता.अशा तुरुगवास व कारावास भोगलेल्या आणिबाणि वीरांना मानधन सुरु करण्यात आले होते परंतु राज्य सरकारने सदरील मानधन  गेल्या आठ दहा महीण्यापासून बंद केल्याने सध्या आणिबाणि वीरांची परवड होत असल्याने कंधार तालुक्यातील जवळपास 40 ते 50 आणिबाणि विरांनी आणीबाणी विरोधी सत्याग्रह लाढ्याचे प्रमुख ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी,माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्याकडे धावा घेतला असून न्याय मिळवून देण्याची लेखी मागणी केली आहे.

आपल्या भारतात लोकशाही शासन प्रणाली प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 अंमलात आल्यानंतर आरंभ झाली.पण 25 जुन 1975 रोजी तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांनी आणीबाणी देशावर लावतांना देशवासियांची मुस्कटदाबी केली.त्या वेळी मन्याड खोर्यानी चळवळींच्या माध्यमातून मर्दुमकी दाखवत ज्येष्ठ स्वातंत्रता सेनानी,माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवराव धोंडगे  यांच्या नेतृत्वात जाचक आणीबाणी विरुध्द गनीमी काव्याने लढा संपुर्ण कंधार तालुक्यात उभारला गेला.आणीबाणीचा विरोध केल्यामुळे अनेकांना नाशिकच्या सेंट्रल जेल मध्ये महिनोगणती कारवास भोगणारे 13 स्थानबद्ध होते.

पण त्यांच्या सोबत अनेक तरुणांनी या आणीबाणी विरोधी लढ्यात सहभागी होवून कुणी 1 महिना तर कुणी 2 महिने तर कुणी अनेक  महिने तत्कालीन तरुण रक्ताच्या विर सत्याग्हींनी कारावास भोगला.

त्यात भाई गुरुनाथराव कुरुडे,भाई संभाजी पा.पेठकर,अॅड.बाबुराव पुलकुंडवार,भाई राजेश्वरराव आंबटवाड,भाई रामराव पा.पेठकर,भाई पंढरीनाथ कुरुडे,भाई रोहिदास सर्केलवाड,भाई संभाजीराव केंद्रे ,भाई आनंदराव पा.शिंदे दाताळकर,भाई गंगाराम पा.कदम जानापुरीकर,भाई बापुराव वाडीकर,आदी सह अनेकांनी जेल भोगली.

या पुर्वीच्या सरकारनीं या सत्याग्रहींना रुपये10000( दहा हजार )पेंन्शन मंजुर केले.जसेही तिन पक्षांचे सरकार येताच या सरकारने सुडबुध्दीने कोरोनाचे कारण दाखवत निर्णयाची आणीबाणी लावून निधी अभावी पेंन्शन बंद केले.कोरोना काळातली परिस्थिती पुढे करुन नव्हे तर आणीबाणी लावलेला पक्ष सत्तेत आल्यामुळे सदरील पेंन्शन योजना बंद करण्याचा तुघलकी फर्मान काढले.

या आणीबाणी विरोधी सत्याग्रही वीर भीमराव पहेलवान वंजे यांनी जिल्ह्याधिकार्यानां पत्र लिहून त्यांची प्रत आणीबाणी विरोधी सत्याग्रह लाढ्याचे प्रमुख डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांना पत्र देवून  न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.यावेळी माजी सरपंच पंडीत पाटील पेठकर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *