जलाशयाला धोका, यौनशोषण करणाऱ्या बेकायदेशीर लोजिंग व बोर्डिंग तोडाव्यात, अन्यथा आंदोलन–आरपीआय डेमोक्रॅटिक

मुंबई दि (प्रतिनिधी)

संबंध मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या जलाशयाला धोका निर्माण होनार असल्याची भीती निर्माण झाली असल्याने आरे कॉलोनी परिसरातील बेकायदाल बांधलेली लोजिंग बोर्डिंगस तात्काळ तोडावी अन्यथा मा राज्यपाल भवणासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.

आमदार टी एम कांबळे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष्याचे केंद्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर व राज्य महासचिव पँथर श्रावण गायकवाड यांनी मा. राज्यपाल, मा. गृहमंत्री स्थानिक पोलीस ठाणे, व पोलीस तथा बृहन्मुंबई आयुक्त व स्थानिक उपायुक्त यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सबंध मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणारे आरे परिसरात दोन तलाव आजूबासजूला असून याच परिसरात विनापरवाना ग्रीन झोनमध्ये काही लोजिंग बोर्डिंग बांधण्यात आले आहेत.

या लोजिंग बोर्डिंगस ना कोणी परवाना दिला ? याचा तपास लावून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई कारावू व “त्या” दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, शिवाय अतिक्रमण झालेले असतानाही कानाडोळा करून अतिक्रमण ना तोडणार्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारला जावा असे म्हंटले आहे.

या ठिकाणी कोणी संशयित सहज व सोपय मार्गाने मुक्काम करून या जलाशयात विष ओतू शकतो किंवा जलाशय फोडू शकतो किंवा बॉम्ब ने उडवून देऊ शकतो या गोष्टीला नजरंदाज करणे म्हणजे गुन्हा व गुन्हेगाराला बळकटी देने होय. असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या अनाधिकृत बांधलेल्या लोजिंग बोर्डिंगस मध्ये बरीच रूम्स असून भारतीय संस्कृतीला येथे कालिंबा फासला जातो, सदर ठिकाणी नवीन प्रेमीयुगलांना त्यांची कामवासना भागविण्यासाठी तासाभरासाठी रूम्स 1000 रुपये ते 1200 रुपये पर्यंत इरायाने रूम्स दिले जातात, यामुळे या ठिकाणी मुलीला फूस लावून तर लग्नाचे खोटे आमिष देऊन तिच्या सोबत भावनिक संभोग केला जातो, यामध्ये शरीसुखाच्या मागणीसाठी मुलीचा होकार असला तरी तिची फसवणूक होतेय हे तिच्या उशिराने लक्षात येते, मग नैराश्यग्रस्थ होऊन गर्भपात करावा लागतो किंवा आत्महत्या करावी लागते.

सहज व सोप्या मार्गाने येथे कामक्रीडेसाठी रूम्स उपलब्ध जरून दिले जातात हा प्रकार पण या लोजिंग बोर्डिंगस तोडल्यानंतर यौनशोषण कायमस्वरूपी बंद होऊ शकते.

अनधिकृत लोजिंग बोर्डिंग 8 दिवसात नाही तोडल्यास उग्र आंदोलन उभे करू व आंदोलनाचाच एक भाग म्हणून मा. राज्यपाल भवन समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा डॉ राजन माकणीकर व श्रावण गायकवाड यांनी दिला आहे.

या प्रकरणात आरे अधिकारी, पोलीस प्रशासन व एस वॉर्ड बृहसन्मुंबई विभागाचे अधिकारी दोषी असून त्यांचे वर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे, अनधिकृत कारवाया ना रोखता कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे महत्वाचे वाटते. असेही पँथर माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *