कंधार (प्रतीनीधी)
नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांचे विश्वासु सहकारी विनोद पाटिल तोरणे यांची भारतीय जनतपार्टि कंधार तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात येऊन त्यांना नियुक्ती पञ प्रदान करण्यात आले .
दिनांक ११ नोव्हेंबर रोजी प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या कंधार येथील संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टि चे नांदेड जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटिल चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत भा.ज.पा.कंधार तालुका नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात कंधार तालुका सरचिटणीस पदी खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांचे विश्वासु सहकारी विनोद पाटिल तोरणे यांच्या कार्याची पक्षाने दख्खल घेवुन भारतीय जनतपार्टि कंधार तालुका सरचिटणीस पदि निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्ती पञ भारतीय जनता पार्टि चे जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटिल चिखलीकर यांच्या हास्ते प्रदाण करण्यात आले .
यावेळी बाबुराव केंद्रे ,जफरोदीन बाहोद्दीन ,मधुकर पटील डांगे ,सुंदरसींग जाधव ,शैलेश बोरलेपवार ,भगवान राठोड ,गंगाप्रसाद यन्नावार निलेश गौर यांच्या सह कंधार तालुक्यातील भा.ज.पा. च्या आदी कार्यकर्त्यांची ऊपस्थिती मोठ्या प्रमाणात होती ! या निवडी बदल खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर ,जि.प.सदस्य तथा भा.ज.पा.जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटिल चिखलीकर ,जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर ,यांच्यासहआदी आदी मान्यरांनी शुभेच्छा दील्या.