कंधार ; मिलींद गोधने
जिल्ह्याच्या विकासात सर्वात महत्वाची भुमिका पार पाडणारी समिती म्हणून DPDC अर्थात जिल्हा नियोजन आणि विकास समिती असते. या महत्त्वपूर्ण अशा समितीवर आमच्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा. हरीहरराव भोसीकर यांची निवड झाली आहे.
विकासाच्या बाबतीत नवी दृष्टी आणि काम करण्याची हातोटी असलेले जिल्ह्यातील आणि विशेषतः लोहा-कंधार मतदारसंघातील बहुजनवादी व्यक्तिमत्व असलेल्या हरीहरराव भोसीकर यांच्या निवडीमुळे. संपूर्ण जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच विविध पक्षीय नेत्यांकडून साहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.