भाजपाच्या शहराध्यक्षपदी अॅड गंगाप्रसाद यन्नावार यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी ची कंधार शहर व तालुका कार्यकारणी दि ११ रोजी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटिल चिखलीकर यांनी जाहीर केली त्यात कंधार शहराध्यक्ष पदी अॅड गंगाप्रसाद यन्नावार यांची फेर निवड करण्यात आली.

कंधार येथे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी दि ११नोव्हेंबर रोजी भाजपा पदाधिकाऱयांची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटिल चिखलीकर हे होते तर प्रमुख पदाधिकारी किसान मोर्च्या चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्र ,उपनगराध्यक्ष महमद जफरोद्दीन बाउद्दीन,राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तुकाराम वारकड ,तालुकाध्यक्ष भगवान राठोड हे होते यावेळी भारतीय जनता पक्षाच्या मागिल संगटात्मक व पक्षीय,सामाजिक धार्मिक कामांची दखल घेऊन अॅड गंगाप्रसाद गोविंदराव यन्नावार यांची कंधार शहराध्यक्षपदि फेर निवड करण्यात आली तर उर्वरित शहर कार्यकारणी ची खालील प्रमाणे निवड करण्यात आली.


भारतीय जनता पार्टी कंधार शहराअध्यक्ष अॕड.गंगाप्रसाद यन्नावार उपाध्यक्ष .दिपक आवाळे ,व्यंकटराव मामडे,सुनिल कांबळे ,शंतनु कैलासे ,सय्यद अमजद सय्यद रशीद ,उत्तम पाटील जाधव सरचिटणीस श्री.मधूकर डांगे ,चेतन केंद्रे.
चिटणीस .शिवाजी पाटील लुंगारे ,शैलेश बोरलेपवार ,बालाजी पवार ,शेख मझर शेख ईस्माईल महेश मोरे ,सुरेशराव दिलेराव,म.जफर म.आकबर, कोषाध्यक्ष मंगेश फरकंडे.सोशल मिडीया प्रमुख .रजत शहापुरे ,शेख मेराज मगदुम शेख ,कार्यकारणी सदस्य बालाजी पवार, किशनराव गित्ते, शेखर वडजकर, शुभम संगणवार, विकास कांबळे,मनोज रहाटे माधव तांबोळी भगवान राशिवंत विक्की रहाटे .सचिन जैन .आरेफ खान ऊस्तुम खान आदींची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटिल चिखलीकरकिसान मोर्च्या चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्र ,उपनगराध्यक्ष महमद जफरोद्दीन बाउद्दीन,राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तुकाराम वरकड,तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,ओबीसी जिल्हा कार्यकारणी चे सुदरसिंग जाधव, युवा मोर्च्या जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष राजहंस शाहपुरे ,युवा मोर्च्या चे तालूका अध्यक्ष साईनाथ कोळगिर हे उपस्थित होते.

या निवडी बद्दल नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार डॉ तुषार राठोड,आमदार राम पाटील रातोळीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर,महिला मोर्च्याच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे ,महिला मोर्च्या जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

***** Advt.******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *