अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सुप्रीम कोर्टांने जामीन मंजूर केला. रात्री ८.१५ वाजता अर्णब तळोजा कारागृहातून बाहेर आले. यावेळी गोस्वामी हे बाहेर पडताच गाडीतूनच ‘भारत माता कि जय’ अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी कारागृह परिसरात मोठी गर्दी केली होती.
अर्णब जिंदाबाद, भारत माता कि जय यांसारख्या घोषणा सुरु केल्या होत्या. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी ‘हॅपी दिवाळी अर्णब,’ ‘सत्यमेव जयते’ अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाईलची टॉर्च लावून सर्वानी केले.
अर्णब गोस्वामी यांना न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या आणखी दोन आरोपींनादेखील जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई उच्च न्यायालयाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान केलं.
इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींचं नाव होतं. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर गोस्वामींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज या प्रकरणी सकाळी साडे दहापासून सुनावणीस सुरुवात झाली. न्यायालयात ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी अर्णब यांची बाजू मांडली.
गेल्या आठवडाभरापासून हे प्रकरण देशभर गाजत आहे. गोस्वामींच्या बाजुने भाजपा राजकीय अटक असल्याचे आरोप करत आहे. तर उच्च न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळत खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितल्या विरोधात गोस्वामी सर्वोच्च न्यायालायत गेले आहेत. येथे न्यायालयाने राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाला फटकार लगावली आहे.
अर्णब गोस्वामींच्या बाजुने प्रसिद्ध वकील हरीश साळवे युक्तीवाद करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असेल तर, आम्ही न्यायालय म्हणून त्यांच्या मदतीसाठी आहोत, हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे.
अर्णब गोस्वामींच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या वकील हरिश साळवे यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. तर, महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी कॅव्हेट दाखल केले असून त्यांची बाजू ऐकल्याशिवास निर्णय देऊ नये, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे.
यावेळी साळवे यांनी न्यायालयाला जर महाराष्ट्रात राज्य सरकारचे नाव लिहून किंवा त्यांना दोष देत जर कोणी आत्महत्या केली तर मुख्यमंत्र्यांना अटक करणार का, असा सवाल केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुद्दे
आपली लोकशाही सर्वसाधारणपणे लवचिक आहे, महाराष्ट्र सरकारने हे सर्व दुर्लक्षित केलं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने आणली तर, हे न्यायाचे अध:पतन होईल. महाराष्ट्र सरकारला याप्रकरणात कोठडी देऊन चौकशीची गरज वाटते?आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा करत आहोत. जर संवैधानिक न्यायालय हस्तक्षेप करत नसेल तर आपण विनाशाच्या वाटेनं आहोत. आम्ही याप्रकरणी सुनावणी करत आहोत, कारण उच्च न्यायालयाने जामीन दिला नाही आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षणही केलं नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब यांना सत्र न्यायालयात जाण्याचे सुचवले होते. त्यानुसार अर्णब यांनी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज काल दाखल केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णब यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब यांना दिलासा मिळतोय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सुट्टीकालीन खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी घेण्यात येत आहे.
अर्णब गोस्वामी ८ दिवसांनंतर तुरुंगातून सुटले… आणि त्यांनी सेलिब्रेशन केल.. अर्णब यांनी या घोषणा दिल्या आणि मोर्चा वळवला तो थेट आपल्या स्टुडिओकडे. पण जाता जाता त्यांना माध्यमांनी गाठलं आणि कारमधूनच अर्णब गोस्वामींनी उद्धव ठाकरेंना ललकारलं… यानंतर अर्णब मुंबईतल्या त्यांच्या स्टुडिओत पोहोचले.. आणि भावूक झाले… अर्णब यांचे सहकारीही भावूक झाले..अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. रात्री ८.१५ वाजता अर्णब तळोजा कारागृहातून बाहेर आले. या वेळी गोस्वामी हे बाहेर पडताच गाडीतूनच ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी कारागृह परिसरात मोठी गर्दी केली होती.
‘अर्णब जिंदाबाद’, ‘भारतमाता की जय’ यांसारख्या घोषणा सुरू केल्या होत्या. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी ‘हॅपी दिवाली अर्णब’ – ‘सत्यमेव जयते’ अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाइल टॉर्च लावून सर्वांनी केले.
अर्णबची रवानगी तळोजा कारागृहात केल्यापासून तळोजा कारागृहाबाहेर अर्णब समर्थक दररोज गर्दी करीत होते. आजदेखील अर्नबच्या जामिनाची माहिती मिळताच कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. कारागृहातून बाहेर आल्यावर मी सुप्रीम कोर्टाचा आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया गोस्वामी यांनी दिली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जमलेल्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात कारागृहाबाहेर वाहतूककोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले.
इंटिरियर डिझाईनर अन्वय नाईक यांच्या कुटुंबानं ठाकरे परिवाराशी आर्थिक व्यवहार केल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्या व्यवहाराची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेला द्यावी, अशी मागणी सोमय्यांनी केली. त्यानंतर, शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीय सोमय्यांना फटकारला असून ते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.
रेवदंड्याच्या पलीकडे असलेल्या किल्ल्यापासून काही अंतरावर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली. २१ मार्च २०१४ रोजी यासाठी व्यवहार झाला. २ कोटी २० लाख रुपयांचा हा व्यवहार होता. ठाकरे आणि वायकर यांनी नाईक कुटुंबाकडे सदर जमीन खरेदी केली. नाईक कुटुंबासोबत असे आणखी किती व्यवहार झाले? अशा किती जमिनी घेण्यात आल्या?, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले आहेत. सोमय्यांच्या या टीकेनंतर शिवसेनेनं उत्तर देताना, दिल्लीपासून सर्वच नेते अर्णब यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
”ज्यानं एका मराठी बाईचं कुंकू पुसलं, अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासूनचे सर्व नेते करत असल्याचंही परब म्हणाले. किरीट सोमैय्या हे अर्णब गोस्वामी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ ते एखाद्या हत्याऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका मराठीबाईचं कुंकू ज्यानं पुसलं, अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासूनच होत आहे,” असा आरोपच परब यांनी केला आहे. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी ‘हॅपी दिवाळी अर्णब,’ ‘सत्यमेव जयते’ अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाईलची टॉर्च लावून सर्वानी केले.
अर्णब गोस्वामींच्या सोनियांवरील टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून आक्षेप व्यक्त केले. छत्तीसगढमधल्या काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या टी. एस. सिंहदेव यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या विरुद्ध FIR दाखल केली.
आपल्या चॅनलवरच्या एका कार्यक्रमादरम्यान अर्णब यांनी समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्य केलं आणि सोनिया गांधींबाबत अपमानकारक भाषा वापरली, असा आरोप टी. एस. सिंहदेव यांनी केला.
महाराष्ट्रातल्या पालघरमधून सुरतला जाणारे दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाने मारहाण करत हत्या केली होती. हे सगळे चोर असल्याचा या जमावाला संशय होता. यावरूनच अर्णब गोस्वामींनी सोनिया गांधींवर टीका केली होती
कार्यक्रमादरम्यान अर्णब गोस्वामींनी सोनिया गांधीवर केलेल्या या टीकेवर अनेक नेत्यांनी आक्षेप घेतलाय.
सत्यजित तांबेंनी अर्णब गोस्वामींच्या विरोधात संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट केलंय.
त्यांनी म्हटलं आहे, “समाजात धार्मिक तेढ वाढवणे, व बांद्रा/पालघर सारख्या प्रसंगांचे खोटे वृत्तांकन केल्याबद्दल अर्णब गोस्वामीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदन सगळ्या जिल्ह्यातल्या पोलिसांना देण्यात आले आहे. मी स्वतः संगमनेर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली.”
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गोस्वामींवर टीका केलीय. तर अर्णबवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलीय. एडिटर्स गिल्डने अर्णब गोस्वामींवर कारवाई करावी, असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनीही अर्णब गोस्वामींच्या वक्तव्याचा निषेध केलाय.
वेणुगोपाल यांनी म्हटलं, “काही न्यूज अँकर्स सोनिया गांधींच्या तत्वांविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत, हे दुर्दैवी आहे. आपल्या आयुष्याची ५० पेक्षा अधिक वर्षं त्यांनी भारतात घालवली आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींचं बलिदान देत त्यांनी सन्मानपूर्वक आणि चिकाटीने भारतीय असण्याचा अर्थ सिद्ध केलाय.” तर सोनिया इतरांप्रमाणेच एक भारतीय असल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलंय.
मे १९९९ मधला सोनिया गांधींचा एक व्हीडिओ ट्वीट करत त्यांनी लिहिलं, “सोनिया गांधी अर्णब गोस्वामींपेक्षा जास्त भारतीय आहेत. एकीकडे अर्णब विष ओकत देशाच्या चौथ्या स्तंभाला कमकुवत करत असताना, दुसरीकडे सोनिया गांधींनी देशात एकता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी काम केलंय.”
“पत्रकारिता एक सन्मान्य काम आहे, त्यामार्फत जनता लोकशाहीच्या तीन स्तंभांविषयी जाणून घेऊ शकते, विचार करू शकते. पण अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही हे पत्रकारिता कशी करू नये, याचं उदाहरण आहेत.”
काँग्रेसच्या या प्रखर टीकेनंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रांनी सोनिया गांधींवर टीका केली आहे. ते म्हणतात, “भगवान रामांचं अस्तित्त्वं नाही असं सोनिया गांधींनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं. सोनिया गांधींना ना भगवान राम आवडतात, ना राम भक्त.”
अर्णब जे बोलले ते खरं असल्याने काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला केल्याचं भाजपच्या आयटी सेल प्रमुखांनी म्हटलंय.
त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, “विकी केबल्सनुसार २०१३ साली ओडिशा आणि कर्नाटकमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोनिया गांधी करत होत्या. पण त्यांचे हे प्रयत्न ख्रिश्चन लोकांच्या धर्मांतराच्या विरोधात असल्याचं एम. के. नारायणन यांनी सांगितल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती.
मुंबई पोलिसांनी टीव्ही क्षेत्रातील टीआरपी रेटिंग वाढविण्याच्या संदर्भातील घोटाळा उघड केला आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. या टीआरपी घोटाळ्यात दोन मराठी चॅनल्ससह रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्त वाहिनीचं नाव समोर आलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, चॅनलचे टीआरपी वाढविण्यासाठी एक रॅकेट कार्यरत होते. यासाठी घराघरात विशिष्ठ चॅनल सुरू ठेवण्यासाठी पैसे दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनलच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीचे नाव यात समोर आले असून त्यांनी आपल्या टॅनलची टीआरपी वाढवण्यासाठी पैसे दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात सबळ पुरावे हाती येताच रिपब्लिक टीव्ही चॅनलच्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे.
ज्या घरात इंग्रजी येत नाही अशा घरांतही इंग्रजी चॅनलस सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चॅनलचे टीआरपी रेटिंग वाढविण्यासाठी पैसे दिल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणात टीआरपी एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहितीही मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, टीआरपी रेटिंग मोजण्याचं काम बीएआरसी एजन्सी कडून करण्यात येतं आणि त्यासाठी संपूर्ण देशभरात टीआरपी मोजणी यंत्र बसविण्यात येतात. हे यंत्र कुठे बसवण्यात येतात ही माहिती खूपच गुप्त असते. हे कंत्राट बीएआरसीने हंसा या कंपनीला दिलं होतं. आमच्या तपासात असे समोर आले की, हंसा कंपनीचे काही माजी कर्मचारी या रेटिंगचा डेटा टीव्ही चॅनल्ससोबत शेअर करत असत. तसेच पैसे देऊन डेटा मॅन्युपुलेट करण्यात येत होता.
या टीआरपी घोटाळ्यात दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांचा शोध आम्ही घेत आहोत. हे सर्वजण चॅनलच्या वतीने काही विशिष्ट घरात जाऊन प्रति महिन्याच्या हिशोबाने पैसे देत असतं आणि घरात चॅनल सुरू ठेवण्यास सांगत होते. अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या बँक खात्यातून जवळपास २० लाख रुपये जप्त केले आहेत तर साडे आठ लाखांची रोकडही जप्त केली आहे अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंतच्या आमच्या तपासात तीन चॅनल्स संदर्भात माहिती मिळाली होती. यामध्ये ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या दोन मराठी लोकल चॅनल्सचा समावेश आहे. या दोन्ही चॅनल्सच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना पैसे दिले होते अशा ग्राहकांची आम्ही चौकशी केली असता त्यांनी आपल्याला पैसे दिल्याचं मान्य केलं आहे. या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे कर्मचारी, संचालक, प्रमोटर असण्याचा संशय आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत असंही मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.
रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना कोर्टानं दिलासा दिला आहे. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या २ वेगवेगळ्या FIR वर मंगळवार (३० जून) रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
त्यात कोर्टानं गोस्वामी यांच्याविरोधातल्या दोन्ही FIR तात्पुरत्या स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. पण, त्याचवेळी कोर्टानं त्यांच्याविरोधातल्या याचिका दाखल करून घेत त्यावर नियमित सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे.
याआधी २४ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते.
तसंच नागपूर येथे २२ एप्रिल २०२० ला दाखल झालेला FIR वगळता अर्णव गोस्वामी यांच्याविरोधातील सर्व याचिका फेटाल्या होत्या. या पोलीस ठाण्यात दाखल झालेला FIR मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात वळता करण्यात आला आहे. टीव्ही कार्यक्रमादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत काँग्रेसच्या काही नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात FIR दाखल केला होता.
दोन दिवसांपूर्वी ऑन एअर झालेल्या आपल्या शोदरम्यान अर्णब यांनी म्हटलं होतं, “जर एखाद्या मौलवी वा पाद्रीची अशाप्रकारे हत्या झाली असती तर मीडिया, सेक्युलर गँग आणि राजकीय पक्ष आज शांत असते का? जर पाद्रींची हत्या झाली असती तर ‘इटलीवाल्या अँटोनिओ माईनो’, ‘इटलीवाल्या सोनिया गांधी’ आज गप्प असत्या का?”
एकीकडे काँग्रेसने अर्णब गोस्वामीच्या शोमधल्या भाषेवर आक्षेप घेतले तर दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
बुधवारी (२२ एप्रिल) रात्री उशीरा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हीडिओद्वारे त्यांनी हा आरोप केलाय. मुंबईमधल्या ऑफिसमधून घरी परतत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा अर्णब गोस्वामींनी केलाय.
या व्हीडिओमध्ये अर्णब सांगतात, “मी ऑफिसमधून घरी परतत असताना रस्त्यात बाईकवरून आलेल्या दोन गुंडांनी हल्ला केला. मी माझ्या पत्नीसोबत कारमध्ये होतो. हल्लेखोरांनी खिडकी फोडायचा प्रयत्न केला. ते काँग्रेसचे गुंड होते.”
काँग्रेसमधल्या उच्चपदस्थ’लोकांनी मला ‘धडा’ शिकवण्यासाठी या हल्लेखोरांना पाठवलं होतं, असं अर्णब या व्हीडिओत म्हणतात.
पाच मिनिटांच्या या व्हीडिओमध्ये अर्णब यांनी सोनिया गांधींवर टीका करत त्यांना या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवलंय. सोबतच आपल्याला काही झाल्यास त्यासाठी फक्त आणि फक्त सोनिया गांधीच जबाबदार असतील, असंही गोस्वामींनी म्हटलं होतं.
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची बातमी वेगाने व्हायरल झाली होती. सोनिया गांधींविषयीच्या वक्तव्यावरून अर्णबवर टीका झाली. अर्णब गोस्वामींच्या सोनियांवरील टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून आक्षेप व्यक्त केले. छत्तीसगढमधल्या काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या टी. एस. सिंहदेव यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या विरुद्ध FIR दाखल केली.
आपल्या चॅनलवरच्या एका कार्यक्रमादरम्यान अर्णब यांनी समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्य केलं आणि सोनिया गांधींबाबत अपमानकारक भाषा वापरली, असा आरोप टी. एस. सिंहदेव यांनी केला आहे.
महाराष्ट्रातल्या पालघरमधून सुरतला जाणारे दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाने मारहाण करत हत्या केली होती. हे सगळे चोर असल्याचा या जमावाला संशय होता. यावरूनच अर्णब गोस्वामींनी सोनिया गांधींवर टीका केली होती .कार्यक्रमादरम्यान अर्णब गोस्वामींनी सोनिया गांधीवर केलेल्या या टीकेवर अनेक नेत्यांनी आक्षेप घेतलाय.
सत्यजित तांबेंनी अर्णब गोस्वामींच्या विरोधात संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट केला आहे.
त्यांनी म्हटलं आहे, “समाजात धार्मिक तेढ वाढवणे, व बांद्रा/पालघर सारख्या प्रसंगांचे खोटे वृत्तांकन केल्याबद्दल अर्णब गोस्वामीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदन सगळ्या जिल्ह्यातल्या पोलिसांना देण्यात आले आहे. मी स्वतः संगमनेर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गोस्वामींवर टीका केली आहे. तर अर्णबवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलीय. एडिटर्स गिल्डने अर्णब गोस्वामींवर कारवाई करावी, असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनीही अर्णब गोस्वामींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
वेणुगोपाल यांनी म्हटलं, “काही न्यूज अँकर्स सोनिया गांधींच्या तत्वांविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत, हे दुर्दैवी आहे. आपल्या आयुष्याची ५० पेक्षा अधिक वर्षं त्यांनी भारतात घालवली आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींचं बलिदान देत त्यांनी सन्मानपूर्वक आणि चिकाटीने भारतीय असण्याचा अर्थ सिद्ध केला आहे. तर सोनिया इतरांप्रमाणेच एक भारतीय असल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटले. काहींनी या अटकेचे स्वागत केले, तर काहींनी तीव्र विरोध. बॉलिवूडही यावरून दोन गटात विभागलेले दिसले. कंगना राणौत, मुकेश खन्ना अशा काहींनी अर्णबच्या अटकेविरोधात आवाज बुलंद केला. याचदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अखेर शिवसेनेच्या वाघाने हिंमत दाखवली, अशा शब्दांत त्यांनी अर्णब गोस्वामींना जोरदार टोला लगावला.
शिवसेनेचा वाघ उद्धव ठाकरेने आपल्या पित्यासारखी हिंमत दाखवली आणि भूंकणारऱ्या मांजरीला न्यायालयाच्या पिंजऱ्यात कैद करण्याचे शौर्य दाखवले, अशी आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली. या पोस्टमध्ये त्यांनी अर्णब यांच्या नावाचा उल्लेख टाळला. पण त्यांची ही पोस्ट कोणासाठी आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही.
राम गोपाल वर्मांची ही पोस्ट पाहून साहजिकच अर्णब गोस्वामींचे फॉलोअर्स भडकले. मग काय, त्यांनी वर्मा यांना जबरदस्त ट्रोल केले. ‘काय विनोद आहे, रिअल टायगर इन शिवसेना… हा..हा..हा… फक्त एकच वाघ होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तसे तू आपल्या कामावर लक्ष दे. चित्रपट बनव. शेवटी कितीही चाटुगिरी केली, तरी तुला कोणी पुरस्कार देणार नाही…,’अशा शब्दांत एका युजरने राम गोपाल वर्मा यांना ट्रोल केले. एका युजरने राम गोपाल वर्माच्या पोस्टवरून त्यांचे अज्ञान काढले. ‘कोणत्या शाळेत शिकला आहात सर तुम्ही? मांजरी भूंकत नसतात.. ’, असे या युजरने लिहिले. तर आणखी एकाने ‘आता एकदा भुंकणाऱ्या मांजरीवर सिनेमा बनवा..,’ अशा शब्दांत वर्मा यांच्या पोस्टची खिल्ली उडवली.
कामावर लक्ष दे. चित्रपट बनव. शेवटी कितीही चाटुगिरी केली, तरी तुला कोणी पुरस्कार देणार नाही…,’अशा शब्दांत एका युजरने राम गोपाल वर्मा यांना ट्रोल केले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटले. काहींनी या अटकेचे स्वागत केले, तर काहींनी तीव्र विरोध. बॉलिवूडही यावरून दोन गटात विभागलेले दिसले. कंगना राणौत, मुकेश खन्ना अशा काहींनी अर्णबच्या अटकेविरोधात आवाज बुलंद केला. याचदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अखेर शिवसेनेच्या वाघाने हिंमत दाखवली, अशा शब्दांत त्यांनी अर्णब गोस्वामींना जोरदार टोला लगावला.
काय म्हणाले वर्मा?
शिवसेनेचा वाघ उद्धव ठाकरेने आपल्या पित्यासारखी हिंमत दाखवली आणि भूंकणा-या मांजरीला न्यायालयाच्या पिंजऱ्यात कैद करण्याचे शौर्य दाखवले, अशी आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली. या पोस्टमध्ये त्यांनी अर्णब यांच्या नावाचा उल्लेख टाळला. पण त्यांची ही पोस्ट कोणासाठी आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही.
राम गोपाल वर्मांची ही पोस्ट पाहून साहजिकच अर्णब गोस्वामींचे फॉलोअर्स भडकले. मग काय, त्यांनी वर्मा यांना जबरदस्त ट्रोल केले. ‘काय विनोद आहे, रिअल टायगर इन शिवसेना… हा..हा..हा… फक्त एकच वाघ होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तसे तू आपल्या कामावर लक्ष दे. चित्रपट बनव. शेवटी कितीही चाटुगिरी केली, तरी तुला कोणी पुरस्कार देणार नाही…,’अशा शब्दांत एका युजरने राम गोपाल वर्मा यांना ट्रोल केले. एका युजरने राम गोपाल वर्माच्या पोस्टवरून त्यांचे अज्ञान काढले. ‘कोणत्या शाळेत शिकला आहात सर तुम्ही? मांजरी भूंकत नसतात.. ’, असे या युजरने लिहिले. तर आणखी एकाने ‘आता एकदा भुंकणे…..
विधानसभा हक्कभंग प्रस्तावाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अर्णव गोस्वामी यांच्या अटकेला स्थगिती देऊन विधानसभा सचिवांना कंटेम्प्टविषयी नोटीस बजावली आहे. हे एवढ्यासाठी सांगितले हायकोर्टाला की, गोस्वामी यांना लक्ष्य करण्याचा राज्य सरकारकडून वारंवार प्रयत्न होत आहे. वाईट हेतूने आणि जाणीवपूर्वक गोस्वामी यांच्याविरोधात सर्व काही सुरू आहे’ असे गोस्वामींतर्फे ज्येष्ठ वकील अॅड. हरिश साळवे यांनी मुंबई हायकोर्टात आरोप केले.
अॅड. हरिश साळवे यांच्यासाठी एका ज्युनिअर वकिलाने अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कोठडीविषयी दिलेल्या आदेशाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर वाचन केले गेले. ‘आधीचा ए-समरी अहवाल अस्तित्वात असताना आणि त्याला आव्हान देण्यात आलेले नसताना आणि पुन्हा तपास सुरू करण्यासंदर्भात न्यायालयाचा आदेश मिळवला नसताना पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केल्याचे दिसत आहे. आरोपींकडून कोणत्याही गोष्टी हस्तगत केलेल्या नाही. जी काही कागदपत्रे ही फिर्यादींकडून मिळवलेली आहेत. मे-२०१८ मधील आत्महत्यांच्या घटनांसंदर्भात आरोपींशी संबंध प्रस्थापित होत असल्याचे पोलिसांनी दाखवलेले नाही. पूर्वी झालेला तपास कसा अपूर्ण आहे? त्यात काय त्रुटी आहेत? हेही सरकारी पक्षाने दाखवलेले नाही. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी द्यावी, या सरकारी पक्षाच्या विनंतीचे समर्थन होऊ शकत नाही‘, असे न्यायदंडाधिकाऱ्यांनी ४ नोव्हेंबर रोजी पोलीस कोठडीची विनंती फेटाळताना आदेशात नमूद केल्याचे अॅड. हरिश साळवे यांनी निदर्शनास आणले.
विधानसभेत अर्णब गोस्वामी यांचे वार्तांकन कसे सुरू आहे आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून कसा अवमान करत आहेत इत्यादीविषयी विधानसभेत चर्चा झाली. त्यावेळी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचे प्रकरण हे पुन्हा तपासासाठी दिले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केली. त्यापूर्वी पालघर झुंडबळी प्रकरणाच्या निमित्ताने केलेल्या वार्तांकनाविषयी गोस्वामींच्या विरोधात अनेक एफआयआर करण्यात आले. त्यानंतर टीआरपी घोटाळ्याप्रकरणी एफआयआरमध्ये नाव नसतानाही रिपब्लिक टीव्हीचे नाव मुंबई पोलिसांनी घेतले. त्यालाही आम्ही रिट याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान दिले आहे आणि आता नाईक प्रकरणात गोस्वामींना लक्ष्य केले जात आहे.’’, असा युक्तिवाद साळवे यांनी केला. तसेच मुंबई हायकोर्टाने पुन्हा सुनावणी ठेवली, त्यावेळी गोस्वामींना सुटकेचा अंतरिम दिलासा देण्याच्या विनंतीविषयी विचार करण्याचे संकेत दिले असून केवळ अंतरिम दिलासाविषयी सुनावणी घेऊ, असेही स्पष्टपणे खंडपीठाने सांगितले होते.
आता ह्या सर्व गदारोळात हे महाराष्ट्रात सत्तेवर असलेली महाविकास आघाडी आणि विरोधकांतील आरोप प्रत्यारोपांमध्ये सगळा कालखंड जात आहे. तसेच जनतेचे केवळ यातून मनोरंजन होत आहे. त्यामुळे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहत आहेत. अर्णव गोस्वामी खरंच दोषी असतील तर त्यांना शिक्षा होणे क्रमप्राप्त आहे. परंतु आजचे काही राजकारण सुरू आहे ते केवळ सत्तेसाठी असून सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे, त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न
कसे सुटतील? माणसांचे जगणे सुसह्य कसे होईल? अर्णव गोस्वामी सुद्धा आता तर खेळ सुरू झाला आहे अशी चिथावणी देत आहेत. आधी कंगना राणावत आणि आता अर्णव. ही मालिका पुढेच सुरू राहणार आहे का? की हे सरकार जनतेसाठी काम करणार आहे का? गोस्वामीनीही या गोष्टीचा विचार करावा.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
१२.११.२०२०