लोहा / प्रतिनिधी
आज दिनांक १३ रोजी लोह्यात स्वाभिमानी भीम सेनेच्या वतीने पदवीधरांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली असून या निवडणुकीमध्ये पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदवीधरांचे ध्येय धोरण ठरविण्यासाठी स्वाभिमानी भीम सेनेचे लोहा – कंधार विधानसभा अध्यक्ष विलास सावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले असून सदरील बैठक हाॅटेल शिवशंकर येथे सकाळी ११ आयोजित करण्यात आली आहे.
तरी या बैठकीला पदवीधर बांधवांनी उपस्थित रहावे असे आव्हान युनूस शेख, , श्याम पाटील नळगे, विनोद महाबळे, शिवाजी पांचाळ, प्रविण महाबळे, संजय कहाळेकर , शिवराज पाटील पवार, सुनील हटकर, आदीने केले आहे.