योग संदेश ;एक तास स्वतःसाठी

संस्कृत मधील खालील श्लोक बरच काही सांगून जातो.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥


सगळे सुखी होवो, सगळे रोगमुक्त राहो, सगळे चांगल्या, मंगल घटनांचे साक्षीदार बनो, आणि कोणाच्या वाट्याला दुःख ना यावं…

या पाच ओळींमधून जीवन जगण्याचा अर्थ उलगडण्यात आला आहे.
आजच्या काळात प्रत्येक जणाला कोणती न कोणती समस्या त्रास देत आहे. धावपळीच्या युगामध्ये स्वतःकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातून असंख्य व्याधी होतात.आजचं जग तंत्रज्ञानाचं जग म्हणून ओळखलं जातं. मानवानं अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळं मानवाचं जीवन सुखकर आणि गतिमान झालं आहे. स्वतःकडून चांगले देण्याच्या कारणानं आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे याचा विसर मात्र अनेकांना पडलेला दिसून येतो. कमी वयात अनेकांना आजार,व्याधी जडलेल्या आहे. या सगळ्यांपासून मुक्त व्हायचं असेल आणि आरोग्य निरोगी बनवायचं असेल तर त्यावर एकाच उपाय आहे आणि तो म्हणजे योग.

आजच्या युगात व्यायाम करणे ही गोष्ट गरजेची झाली आहे. आधुनिकीकरणामुळे माणसाच्या जीवनात बदल झालेला आपण बघू शकतो. व्यस्त दिनचर्या, वेळेवर न जेवणं, अपुरी झोप, जंक फुडचं सेवन, तणाव या सगळ्या गोष्टींनी आपल्या जीवनात घर केलं आहे. त्यावर मात करण्यासाठी योग हे औषध आहे. दररोज एक तास जर योगरूपी औषध घेतले तर अनेक व्याधींपासून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळं प्रत्येकानं रोज एक तास तरी स्वतःसाठी राखून ठेवले पाहिजे. योग केल्यानं मन शांत राहण्यास मदत होते.


बदलत्या जीवनशैलीमुळॆ शरीरावर मोठया प्रमाणात बदल होत आहे.व्यायाम म्हणजे नेमकं काय…? हा प्रश्न तुम्हाला पडला असले. व्यायाम म्हणजे शरीराची योग्य रीतीनं आणि नियमित केलेली हालचाल होय.* रोजची धावपळ, दगदग, उठबस म्हणजे व्यायाम नव्हे व्यायाम हा करावाच लागतो तोही शास्त्रशुद्ध पद्धतीने. प्रकृती चांगली ठेवण्याकरिता चौकस आहार, योग्य विश्रांती, मनःशांती या मूलभूत गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा व्यायाम होय. पहाटे उठून आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा फिरायला आलेले बरेच लोक आपल्याला दिसतात. परंतु त्यांची संख्या आपण लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचारात घेतली तर ती आपल्याला कमी दिसून येते.


व्यायामशाळेत ठराविक व्यायाम करणं, पोहणं, सायकल चालवणं, धावणं, योगासने करणं आणि चालनं या सर्वांचा व्यायामात समावेश आहेच पण त्याचबरोबर आताच्या युगात झुंबा डांस, एरोबिक्स, स्ट्रेचिंग यांसारखे विविध व्यायामाचे नवनवीन प्रकार तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेत. पण सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण व्यायाम आहे. त्याचबरोबर योगासनं आणि प्राणायाम केल्यानं स्नायू बळकट होतात तसेच या प्रकारामध्ये श्वसनाच्या विशिष्ट पद्धतीचा वापर होतो.


व्यायाम केल्याने शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो. व्यायाम केल्याने शरीर आकर्षक, बांधेसूद बनतं. व्यायामामुळे शरीरात असलेलं मेदाच प्रमाण कमी होतं. त्यामुळं शरीराला हलकेपणा येतो. स्थूलता होत नाही. व्यायाम केल्यामुळं झोप व्यवस्थित लागते. तसेच मानसिक तणावापासून मुक्ती मिळते. शरीर मजबूत होऊन रोगप्रतिकारक शक्तिमध्ये वाढ होते. मधुमेह,हृदयरोग यांसारखे आजार दूर राहतात.
21 जुन हा जागतिक योग दिवस म्हणून सुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक मोठं यश आहे. व्यायाम ही सुखी, निरोगी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.

Health Is Wealth


ती आपणास दुसरं कोणी देऊ शकणार नाही किंवा आपण विकत घेऊ शकत नाही. जर शरीर साथ देत नसेल तर दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला अर्थ नाही.* त्यामुळं इतर कामांपेक्षा पहिले आरोग्याला जास्त महत्त्व देणं हितकारक ठरेल.
धनत्रयोदशीच्या ग्रूपमधील सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
निरोगी निरामय आरोग्य लाभो.

निळकंठ मोरे,योग शिक्षक
करा योग 🧘‍♀️राहा निरोग
पतंजली योग समिती कंधार🙏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *