स्वाध्याय सोडवणे झाले सोपे ;पहीली ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांना होतोय लाभ
कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार तालुक्यातील मजरे धर्मापुरी (तांडा)येथिल भुमिपुत्र तथा अहमदनगर जिल्हातील जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा येथे कार्यरत असणारे दिव्यांग शिक्षक श्री बळीराम जाधव यांनी स्व कल्पनेतून विद्यार्थी- शिक्षक- पालक यांना अतिशय उपयुक्त असे शैक्षणिक ॲप तयार केले आहे. पहीली ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होत असून अनेकांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे.
या शैक्षणिक ईसाहित्य अँप चे उद्घाटन जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी मा.श्री. कोकणी साहेब आणि आणि गटशिक्षण अधिकारी प्रमुख आदरणीय श्री.नागनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हे पंचायत समिती कार्यालयात झाले.
यावेळी बोलताना तालुक्याचे गट विकास अधिकारी मा.श्री. कोकणी साहेब यांनी अँप विषयी माहिती घेतली आणि तालुक्यातील सर्व शिक्षकांपर्यंत हे अँप गेले पाहिजे असे सांगितले. तसेच बळीराम जाधव सरांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर गटशिक्षणाधिकारी मा.श्री. नागनाथ जी शिंदे साहेब यांनी पण जाधव सरांचे खूप खूप कौतुक केले. सध्या कोरोणाच्या काळात चालू असलेल्या शैक्षणिक कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सध्या सर्वत्र कोरोणाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे सध्या शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बळीराम जाधव यांनी संपूर्ण लॉकडाउनच्या काळात ॲप साठी लागणारे साहित्य निर्मिती करून सर्वांना त्यांचे साहित्य एकत्रित पाहता यावे म्हणून त्यांनी हे ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे विद्यार्थी नक्कीच शिक्षणाच्या प्रवाहात येतील असे बळीराम जाधव यांनी सांगितले.
या उपक्रमाचे कौतुक अहमदनगर जिल्हाचे मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे,तसेच जामखेड तालुक्याचे गटशिक्षणअधिकारी नागनाथ शिंदे ,गटविकास अधिकारी परशुराम कोकणी आदीसह राज्यातील शिक्षक प्रेमी पालकांनी केले आहे.