बहाद्दरपुरा येथिल सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने केला नागरी सत्कार

कंधार ; मो.सिकंदर

कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत बहाद्दरपुरा या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने समस्त गावकऱ्यांच्या वतीने सरपंच व उपसरपंच व सदस्यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करून सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांना निरोप निरोप देण्यात आला.

कंधार तालुक्यातील बहादरपुरा या ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला असून या पाच वर्षाच्या काळात सरपंच माधवराव पा.पेठकर व त्यांच्या सर्व टीमने चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.भाई गुरुनाथराव कुरुडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अॉड मुक्तेश्वर धोंडगे व मा. जि.प.सदस्य डॉ.पुरुषोत्तम धोंडगे हे उपस्थित होते.

सरपंच माधवराव पा. पेठकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासकामांना महत्त्व दिले आरोग्य,विज पुरवठा,पाणी रस्ते या मूलभूत सुविधांना प्रथम कर्तव्य मानुन प्राधान्य दिले, गावकर्‍यांना पाच रुपये मध्ये वीस लिटर फिल्टरचे पाणी दिले,गावातील संपूर्ण गल्लीबोळात कामे करून त्यावर वृक्षारोपण करण्याचा महत्त्वपूर्ण काम केले. ग्रामपंचायतीला अकरा कर्मचारी ठेऊन गावातील स्वच्छतेवर भर दिला.

भाई डॉ.केशवराव धोंडगे यांनी मन्याड नदीच्या काठावर बालउद्या निर्मिती केली होती निधीअभावी हे उद्यान नामषेश झाले होते या उद्यानाला निधी प्राप्त करून सरपंच माधवराव पा.पेठकर यांनी गतवैभव प्राप्त करून दिले आहे त्यामुळे त्याच्या विकासात या उद्यानाची भर पडली आहे.

सर्वात मोठी बाब म्हणजे या ग्रामपंचायतीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यामध्ये पारदर्शक कारभार करून केलेल्या कामाचा गावकऱ्यांना हिशोब देणारी महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.यासारखे महत्त्वपूर्ण कामे केल्याने माधवराव पा. पेठकर हे जनसामान्यांचे हृदयात बसले होते.

त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अनेकांनी आपले मते मांडताना कंठ दाटून आले तर अनेक जणांना अश्रू अनावर झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माझ्या पाहण्यानुसार असे सरपंच आजपर्यंत झाला नाही आणि यापुढेही होणार नाही त्यामुळे येणारे पाच वर्षाच्या काळात हेच सरपंच राहावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.

या वेळी सरपंच माधवराव पेठकर, यांनी ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांनी व गावकऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल व ऋण व्यक्त करुन आभार मानले.या वेळी उपसरपंच-गुरुनाथ पेठकर,माजी उपसरपंच उत्तम भांगे,माजी उपसरपंच-जाहेदाबी शेख सरवरसाब,सदस्या सौ.केवळाबाई ऐनवाड,सौ.नसीमाबी अफजलसाब, सौ.अणिता मोकिंद खरात, सौ.रसिकाबाई माधवराव कदम, सदस्य बालाजी तोटवाड या सर्वांना निरोप देण्यात आला.प्रा डाॅ.गंगाधर तोगरे सर,गंगाराम रुमाले गुरजी,बालाजी पेठकर, हैदरसाब यांनी मनोगतातून गौरव केला.

कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच पंडित पेठकर व मनोहर पेठकर यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रेय एमेकर गुरुजी यांनी केले.
प्रसंगी उपस्थिती मुस्तफा शेख,परसराम धोंडगे सर,बालाजी टेकाळे सर,बळी पेठकर,साहेबराव शिनगारे,लक्ष्मण उदगीरवाड,नामदेव पेठकर,खादर शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *