कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे केले आवाहन
कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहर व परिसरात वाढती गुन्हेगारी व चोरीच्या घटणा. रोखण्यासाठी व पायबंद घालण्यासाठी जागोजागी पेट्रोलिंग वाढवण्यात आली असून लवकरच चोरीचा छडा लावणार असल्याची माहिती नूतन पोलीस निरीक्षक यु. एम.कस्तुरे यांनी दिली.
कंधार पोलीस स्टेशन येथे दिनांक 11 रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक कस्तुरे यांच्या सत्काराचे आयोजन पत्रकार संघाचे अध्यक्ष मिर्झा जमीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक यु.एम.कस्तुरे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात रेलचेल असते तेव्हा आपल्या प्रॉपर्टीची खबरदारी घेणे हे नागरिकाचे कर्तव्य असून जर कुटुंबांचे स्थलांतर किंवा गावाला जायचे असेल तर तसे पोलिस स्टेशनला कल्पना द्यावी त्यामुळे जेणेकरून येणाऱ्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही तसेच वाढत्या गुन्हेगारी व चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढली असून वाहतुकीला सुरळीत पणा येण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे अशी माहिती या वेळी दिली.
कार्यक्रमाला पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मिर्झा जमिर बेग,दिगांबर वाघमारे ,एस.पी.केंद्रे ,प्रा.भागवत गोरे,माधव भालेराव ,महमद सिंकदर,नितीन मोरे ,हनमंत मुसळे सर्व पदाधिकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार दिगांबर वाघमारे यांनी मानले.