लेखन–गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी
कंधार
मित्र हो माझी बेहाल, दयनिय परिस्थिती पाहून मला सुंदर अक्षर कार्यशाळेचे सर्वेसर्वा सुलेखनकार गोपाळसुत- दत्तात्रय एमेकर गुरुजींनी लेखनीतून माझे दु:ख मांडले.हे दु:ख प्रशासनाला जागे करणारे ठरले.सोशल मिडिया व युगसाक्षी लाईवला येताच खडबडून प्रशासन जागे झाले.अन् पाहता-पाहता माझ्यासाठी दिवाळीचा फराळ का होईना असेच म्हणावे लागेल.पण एक भीती मनाला वाटत आहे.या दीपोत्सवाच्या फराळावरच माझी बोळवण होते की,काय अशी माझ्यावर येणारा-जाणारा पुटपुटतोय.
आज दि 12 नोव्हेबर 2020 रोजी गायगोर्ह्याच्या बारशीला मन्याड खोर्याचे शैल्यकार/आत्मकथनकार दत्तात्रय एमेकर गुरुजी जात होते.त्यावेळी माझ्यासाठी फराळाची व्यवस्था होत असतांना या कामाच्या फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये फोटोज घेतल्या.त्या समयी धातुर-मातूर मुरुम टाकण्याचे काम कांही नारीशक्ती करत होत्या.त्यावरती रोडरोलर दबईचे काम करत होते.पण या पुर्वी अन् आजही माझ्यावरुन गेलेला,प्रत्येक माझा प्रिय प्रवाश्यांना मणक्याचा त्रास,मानेचा त्रास, अशा विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे.एव्हढेच काय दिवाळी सणाला अनेक बायलेकी कुणी माहेरला,कुणी गावाकडे,कुणी सासरला ये-जा करणार्यांना माझी होणारी हाल पाहून त्यांचे डोळे पाणावत आहे.
माझ्या वरुन जातांना गतीरोधकांचा पुंजका असलेल्या रस्त्यावरुन प्रवास करतोय की काय?अशा प्रश्नांनी भंडावून सोडले असेल असे वाटते.मला असा भास होतोय माझ्यावर खड्डेनसुन मीच खड्ड्यात आहे.दिवाळी नंतर का मला डांबरी करणाची मजबुती मिळेल का?या तुटपुंज्या मलमपट्टी करुन बिल लाटण्याचे प्रयत्न होतोहेत का?अशी कुजबुज मला ऐकायले मिळते आहे.असो तुम्हा सर्वांना दीपोत्सवाच्या मनापासून सदिच्छा माझ्या वतीने देत आहे.मला मजबुती मिळे पर्यंत सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार सोशल मिडीयाच्या माध्यमातून व युगसाक्षी लाईव बातम्यांच्या माध्यमातून नेहमी माझी व्यथा मांडत राहणार आहेत.हे मात्र नक्की माझी व्यथा जनसामान्या पर्यंत पोहंचविले त्या बद्दल मी आभाभिनंदन करुन दिवाळी सणांच्या मनस्वी सदिच्छा देवून मानाची कोटी-कोटी जयक्रांति करतो.
मानतो मी आभार तुमचे,
माझे शल्य लिहिल्या बद्दल!
पैसे घेवून मत विकणार्यांना,
केंव्हा घडेल जन्माची अद्दल!
देशाच्या आदर्श संविधान भारतीय धर्मग्रंथांनी मतदानाचा हक्क दिला,पण मतदारांनी पैशाच्या मोबदल्यात विकल्याने माझ्या सारख्या अनेक रस्ते बांधवाची बेहाल तर नक्कीच होणार?यास आपण सर्व मतदार बांधव जबाबदार राहणार हे नक्की!पुर्ण करोना महासंकटाचा लाॅकडाउनचा गेला माझ्याकडे कुणी ढुंकूणही पाहिले नाही…..जगी दिवाळी साजरी होतांना देशात प्रकाशाचे आनंदीपर्व सुरु झाले पण माझ्याकडे यतनेचा सुकाळ असल्याने ही दिवाळी दु:खात घालवावी लागते आहे.
आता पुरे झाले…..दिवाळीत मुरुमाचा फराळ हा तुटपुंजा आनंद माझ्या वाट्याला आला…बस्स आता येथेच थांबतो!
आत्मकथनकार-गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा