बोगस पत्रकारांची चौकशी करून कारवाई करा ; तहसीलदारांकडे मराठी पत्रकारसंघाची मागणी

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार तालुक्यासह जिल्हाभरात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेकिंग केली जात आहे. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कंधार तालुका मराठी पत्रकारसंघाच्यावतीने तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गुरुवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोगस पत्रकारामुळे वृत्तमानपत्र आणि खऱ्या पत्रकारांची प्रतिमा समाजात खराब होत चालली आहे.

यामुळे पत्रकारांकडे संशयाने पाहिले जात आहे. बोगस पत्रकार दिवाळीचे औचित्य साधून बोगस आयकार्ड आणि बोगस दरपत्रक काढून विविध कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाहिरातीसाठी ब्लॅकमेकिंग करीत आहे. यामुळे वृत्तमानपत्र आणि खऱ्या पत्रकारांची कोंडी होत आहे. बोगस पत्रकारांचे लोण संपल्याशिवाय लोकशाहीचा चौथा स्थम्भ असलेल्या पत्रकारितेची विश्वासाहार्ता टिकून राहणार नाही.


बोगस पत्रकाराकडून बोगस कार्ड काढून दिवाळीच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात पैसे वसुलीही केली जात आहे. ज्या पत्रकारांची पत्रकार म्हणून शासन दरबारी नोंद नाही अशांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर मराठी पत्रकारसंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अड. दिगंबर गायकवाड, तालुकाध्यक्ष अड. सत्यनारायण मानसपुरे, सचिव योगेंद्रसिंह ठाकूर, हफीज घडीवाला, दयानंद कदम, एन. डी. दाभाडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *