कंधार ; प्रतिनिधी
बहाद्दरपुरा येथे पन्नास वर्षापासून कपटी वामनाचे दहन क्रांति टावर जवळ डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम होत असतो. आज दि.१६ नोव्हेंबर बलीप्रतीपदेच्या दिवशी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कपटी वामनाचे दहन करुन पन्नास वर्षाची परंपरा अखड चालुच ठेवली.
यावेळी श्री शिवाजी काॅलेज कंधारचे प्राचार्य डाॅ.गीरीमाजी पगडे ,माजी जि.प.सदस्य,प्रतिमुक्ताईसुत डाॅ.प्रा.पुरुषोत्तमजी धोंडगे ,प्रा.भाई शंकरराव आंबटवाड,प्रा रोडगे,माजी सरपंच, माजी उपसरपंच,सेवानिवृत्त मुख्याध्यापक व सहशिक्षक, प्रतिष्ठीत नागरीक नगरीतील तरुण पिढी,अबाल-वृध्द उपस्थित होते.
प्रा. भाई शंकरराव आंबटवाड यांनी प्रास्ताविकतेतून आमले विचार मांडतांना या परंपरेचा इतिहास सांगुन कपटी वामनाच्या धुर्त काव्याने बळीराजाला पाताळात कसे घातले हे विशद केले.
माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी बळीराजा आणि बिरसामुंडा यांचे कार्य बहुजनासाठी प्रेरणादायी आहे.ही परंपरा डाॅ.भाई केशवरावांनी या क्रांतिनगरीत सुरुवात करुन आपली नगरी लढवय्यवृत्तीची असल्याची विविध उपक्रमातून दाखवून दिली असे सांगितले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी सरपंच माधवराव पेठकर यांनी केले.सदाशिव आंबटवाड,शिवाजी ऐनवाड,दत्तात्रय एमेकर,माधवराव आंबटवाड,डाॅ.डोम्पले आदीसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
डाॅ.गीरमाजी पगडे यांनी बळीराच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.डाॅ.प्रा.पुरुषोत्त धोंडगे यांनी विचार मांडण्यास आरंभ केल्यानंतर डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या शैलीत विचार मांडत बळीराजावर वामनाने कपटनीतीचा अवलंब करुन बटूरुपी वामनाने बळीराजाच्या चांगुलपणाचा गैर फायदा घेत बळीराजास पाताळात दडपिले.
तेंव्हा पासुन ईडा-पिडा टळू दे,बळीचे राज येवू दे!असे दीपोत्सवात म्हणन्याची पध्दत वर्षानुवर्ष समाजाला घट्ट चिटकुन आहे.
माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी बळीराजा आणि बिरसामुंडा यांचे कार्य बहुजनासाठी प्रेरणादायी आहे.ही परंपरा डाॅ.भाई केशवरावांनी या क्रांतिनगरीत सुरुवात करुन आपली नगरी लढवय्यवृत्तीची असल्याची विविध उपक्रमातून दाखवून दिली.सुत्रसंचलन माजी सरपंच माधवराव पेठकर यांनी केले.या प्रसंगी श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड, माजी सरपंच शिवाजी ऐनवाड, उपसरपंच पंडित पाटील पेटकर, मनोहर पाटील पेठकर,उत्तम भांगे,गुरुनाथ पेठकर,रुमाले गुरुजी,नामदेव पेठकर, अॅड.किरण ढगे,शंकरराव ढगे,बालाजी पेठकर,दत्तात्रय एमेकर,माधवराव आंबटवाड,डाॅ.डोम्पले सर,
बाबुराव गुरुजी, शहाजी आहेर,बालाजी परोडवाड उपस्थिती होती.