मुंबई दि (प्रतिनिधी)
मुंबई प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त करण्यात येवून नव्या उमेदिच्या कार्यकर्यांना संधी देऊन पक्षाचे बळकटीकरणं करण्यात येणार असल्याने इच्छुकांनी पक्ष कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केले आहे.
डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, माजी आमदार दिवंगत टी.एम.कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आर.पी.आय स्वतंत्रपणे उभा राहावा, सत्तेत बदल होऊन रिपब्लिकन जनतेला सत्तेत सहभाग मिळावा, सत्ता त्यांच्या हाती यावी म्हणून रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाची निर्मिती केली आहे.
आंबेडकरी विचारांच्या पक्षांची राजकीय वाताहात झाली आहे, ती भरून काढण्यासाठी शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या सर्वधर्मीय जनतेला एक करून सत्तेत सहभागी होण्याच्या दिशेने रिपाई डेमोक्रॅटिक वाटचाल करत आहे,पप विविध जातीधर्मांची व वेगवेगळ्या पक्षांची लोक रिपाई डेमोक्रॅटिक कडे येत आहे.
पक्षाला नव चेतना मिळत असून आगामी निवडणुकीत रिपाई डेमोक्रॅटिक स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी होण्याच्या दिशेने मार्गक्रम करत असल्याचा दावा ही यावेळी डॉ माकणीकर यांनी केला.
पक्षाचे युवाध्यक्ष कनिष्क कांबळे महासचिव डॉ राजन माकणीकर व अन्य 2 पदाधिकारी पक्षाची फेरनिवड व बांधणी कमिटी वर नियुक्त असून इच्छुकांनी आपल्या इच्छा व प्रतिक्रिया महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्या कडे लिखित स्वरूपात पक्ष कार्यालयात नोंदवाव्यात असेही पक्षाच्या वतीने नवनियुक्त केंद्रीय उपाध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी सांगितले.
लवकरच शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत असून राज्याच्या राजकारणात एक आमूलाग्र बदल घडणार तर आहेच मात्र रिपब्लिकन व आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या पक्षांकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलेल असा सूतोवाच डॉ माकणीकर यांनी केला.
विद्यमान पदाधिकारी नवीन येणाऱ्या सदस्यांना योग्य सन्मान देऊन पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करतील असा आशावाद पक्षाध्यक्षा आईसाहेब नंदा कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला.