नांदेड ;प्रतिनिधी
आगामी काळात संघटनेला नवयुवकांची ताकद मिळावी व चळवळ गतीमान करुन नव्या कार्यकारणीत तरूणांना जास्तीचे प्राधान्य देण्यासाठी संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्ह्या कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहीती संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांनी दिली.
तसेच याद्वारे नांदेड जिल्ह्यातील गाव पातळीवरील सर्व पदे बरखास्त करण्यात येत आहेत. कार्यकारणीत तरूणांना जास्तीचे प्राधान्य देण्यात येणार आहे. व काही कार्यकर्त्यांची फेर निवड करण्यात येणार आहे. दि. 21 नोव्हेंबर 2020 रोजी सदरील फेर निवड व नवीन कार्यकर्त्यांची निवड करण्यात येणार असल्याने नांदेड जिल्हातील तरुणांनी मोठ्या संख्येने या संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्ह्या कार्यकारणी सामिल होण्याचे आवाहन संस्थापक साईनाथ मळगे यांनी केले आहे.