कंधार- बहादरपुरा- पांगरा – किवळा मार्गी नांदेड बस सेवा सुरू करा कंधार पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे निवेदनाद्वारे मागणी


कंधार; प्रतिनिधी


कंधार शहराच्या परिसरातील गावच्या प्रवाशांची हेळसांड थांबवण्यासाठी कंधार- बहादरपुरा- पांगरा -किवळा मार्गे नांदेड बससेवा सुरू करावी. त्यामुळे शेकडो प्रवासाची हेळसांड थांबलेच याचा फायदा कंधार आगार सह प्रवाशाला होणार असल्याने यामार्गे तात्काळ बस सेवा सुरू करण्याची मागणी चे निवेदन कंधार पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी कंधार आगर प्रमुखांना देण्यात आले.


नांदेड बिदर हायवे वरील नॅशनल महामार्ग 50 वरील बहादरपुरा मानसपुरी पांगरा किवळा नांदेड रस्त्याचे काम उत्कृष्ट झाले आहे. त्यामुळे कंधार परिसरातील पंधरा ते वीस गावांतील , नागरिकांसह महिला कर्मचारी शेतकऱ्यांना विविध कामासाठी नांदेड ला जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. दहा ते पंधरा किलोमीटर प्रवास करून कंधार शहरात ऑटो, जीप किंवा पायी चालात यावे लागतो. व ग्रामीण भागात परत जाण्यासाठी अनेक वेळा वाहने सुद्धा मिळत नसल्यामुळे रात्रीला मोठा त्रास सहन करावा लागतो.

यासाठी वेळ व पैसा त्यासोबत पंधरा ते वीस गावे त्यातील बहादरपुरा, मानसपुरी फुलवळ, बिजेवाडी, जंगमवाडी लालवाडी सुजानवाडी नवरंगपूरा, कोटबाजार, गोगदरी ,बाचोटी, गऊळ बामणी, पांगरा ,खुड्याचीवाडी नागरिकांची हेळसांड थांबण्यासाठी कंधार,-बहादरपुरा- मानसपुरी-लालवाडी किवळा मार्गे नांदेड कंधार आगारची बस सेवा सुरुवात करण्याच्या मागणीचे निवेदन कंधार आगार प्रमुख यांना कंधार पंचायत समितीचे सदस्य तथा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सत्यनारायण मानसपुरे सामाजिक कार्यकर्ते पंडितराव देवकांबळे , बहादरपुरा चे माजी उपसरपंच मनोहर पेठकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *