दिवाळी **** ‌*विजो (विजय जोशी)* ‌

दिवाळी*
‌*विजो (विजय जोशी)*

‌दाखविली त्याने मला
‌त्याच्या शहरातली
‌झगमगीत दिवाळी,
‌डोळे दिपवून टाकणारी
‌वंशपरंपरागत
‌श्रीमंतीचे उंच उंच
‌कंदील उभारलेली…

‌मग,
‌मीही दाखविली त्याला
‌माझ्या झोपडीतली
‌जळजळीत दिवाळी,
‌वारसाहक्काची
‌अठराविश्वे दारिद्र्यात
‌परिस्थितीचे गळफास लावून
‌जागोजागी
‌कंदील लटकवलेली…

‌■■■

Vijay Joshi sir


‌© विजो
‌ विजय जोशी
‌डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *