कंधार ; प्रतिनिधी
किवळा येथे राज्यव्यापी ओड समाज मेळावाचे आयोजन दि.१८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.समाजाती सामाजिक स्थिती यावर मार्गदर्शन करुन पुढील काळातील ध्येय धोरण यावेळी ठरवण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले,
यावेळी आशाताई शिंदे यांनी या महा मेळाल्यास मार्गदर्शन करताना ओड समाजाच्या कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून आपल्या कोणत्याही संकटात मला फोन करा मी सदैव आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करील असे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले .
या वेळी आशाताई शिंदे यांच्या हस्ते लष्करातील बीएसएफ जवानांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गवंडे साहेब, नलवडे साहेब , विठ्ठलराव नलवाडे ,माधवराव वड, शिवाजी डुबुकवाड, अशोक पाटील कळकेकर ,शिवराज पाटील शिंदे, अनिकेत पाटील जोमेगावकर, चंद्रकांत टोकलवाड ,अशोक सोनकांबळे सह कार्यकर्ते उपस्थित होते.