माहूर येथिल अनुसया माता अन्नछत्र बांधकामाचे सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

माहूर;प्रतिनिधी

अनुसया माता मंदीर तिर्थक्षेत्र माहुर येथिल प्रवेशद्वाराच्या बाजूला होत असलेल्या अन्नछत्र बांधकामाचे उदघाटन दि.१९ नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

त्यानंतर दत्त मंदिर व महंत महाराजांचे दर्शन घेण्यात आले यावेळी मंदिर संस्थान च्या वतीने आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी वसमतकर महाराज, नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पा. शिंदे,प्रसिद्ध उद्योजक रमेशजी पारसेवार,जि.प.सदस्या वत्सलाबाई पुयड,अशोक पा.कळकेकर,
तिवरीजी,बालाजीराव शेळके,पत्रकार नंदू संतान सह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *