रामचंद्र येईलवाड, मोहन पाटील शिरसाट पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ….!;कंधार लोहा मतदार संघ राष्ट्रवादीमय करणार — रामचंद्र येईलवाड

कंधार ; प्रतिनिधी

मी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निवडणुका लढवल्या आहेत, राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाची ही धुरा सांभाळली आहे. पक्षाला विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा प्रतिनीधीही पाठवला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे काम मंदावले त्यामुळे दरम्यान राष्ट्रवादी पासून मी दूर राहिलो परंतु लोहा कंधार मतदार संघाला पुन्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन रामचंद्र येइलवाड यांनी कंधार येथे केले.

दिनांक १८ नोव्हेंबर रोजी कंधार येथे रामचंद्र येईलवाड यांच्या वतीने दिपावलीचे औचित्याने पत्रकारांचे स्नेहमिलन व सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम शिरसकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी चा मोठा ग्रुप राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यात आम्ही पण होतो .शेतकरी संघटनेचे झुंजार नेते कार्यकर्ते मोहन पाटील शिरसाट (उमरेकर), श्रीहरी पाटील कदम (मंगल सांगवी) अंकुश येईलवाड माजी सरपंच (संगुचिवाडी ) शिवकुमार देवकते यांनी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी पक्ष प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात प्रवेश केला आहे.

तसेच दरम्यान दिपावाळी हा सण आला त्यात ईडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे …. ते राज्य येण्यासाठी बहीण भावाला ओवाळते व कंबर बांधून कामाला लागण्याचा संदेश देते .त्या भाऊबीज नंतर सर्व कार्यकर्ते मंडळी सोबत व पत्रकारासोबत संवाद साधण्यासाठी सदरील कार्यक्रमाचे आयोजन असून येत्या काही दिवसात कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीमय होण्यासाठी व शरद पवार यांच्या विचाराला बळकटी देण्यासाठी मी सदैव तयार असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीमय करेल असा विश्‍वास यावेळी पत्रकार परिषदेमध्ये रामचंद्र येईलवाड यांनी दिला.

या कार्यक्रमास नांदेड जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष दिगांबर पेटकर, दत्ता कारामुंगे ,ओबीसी सेल प्रदेश सचिव एड. अंगत केंद्रे ,ओबीसी तालुकाध्यक्ष अच्युत मेटकर, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष विशाल गायकवाड आदी सह कंधार तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***** video News****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *