कंधार ;प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या व वसमतकर महाराज यांनी चालू केलेल्या बाळगीर महाराज स्वच्छता अभियान आज गुंडेगाव या गावातून सुरवात झाली.वसमतकर महाराज व बाळगीर महाराज स्वच्छता अभियान महाराष्ट्र महिलाध्यक्ष सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे व बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी पारसेवार यांच्या हस्ते स्वतः गावात झाडू मारून सुरवात झाली.गाडगेबाबांच्या प्रेरनेतून स्वतः वसमतकर महाराज,आशाताईंनी व रमेशजी पारसेवार यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यात सुरवात केली.
स्वच्छता अभियान सुरवातपर कार्यक्रमात आशाताई बोलताना म्हणाल्या की,या बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण गाव स्वच्छ आणि सुंदर करणे त्याचबरोबर गावातील सगळ्या लोकांची मने सुद्धा स्वच्छ आणि निर्मल करणे हा होय.तसेच संपूर्ण गाव व्यसनमुक्त कसे करता येईल या स्वच्छता अभियानातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करणार आहोत असे सांगितले.
आगामी काळात वसमतकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेले बाळगीर महाराज स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबिवणार असल्याचे आशाताईंनी यावेळी सांगितले.याप्रसंगी श्यामगिरी महाराज हर्बळकर,संतोषपूरी महाराज,अशोक पा. कळकेकर ,माधव पा. घोरबांड,तिवरीजी,राम तृप्तेवार,संतोष पाटील सह स्वच्छता अभियानातील अनुयायी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.