कंधार ;प्रतिनिधी
मी जरी नांदेडचा खासदार असलो तरी कंधार- लोह्यावर माझे पूर्ण लक्ष आहे. येथील जनतेने माझ्यावर भरपूर प्रेम केले. या प्रेमामुळेच मी मी दोन वेळा आमदार झालो. कंधार-लोह्याकडे माझे कधीच दुर्लक्ष होणार नाही. येथील जनतेशी माझे सलोख्याचे संबंध होते आणि राहणार, असे स्पष्ट प्रतिपादन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
प्रा. दौलतराव केंद्रे यांच्या निवास्थानी बुधवारी रात्री दिवाळी स्नेह मिलनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रतिभाताई पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, प्रा. डी. एन. केंद्रे, माजी जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, माजी नगराध्यक्षा अनुसया केंद्रे, उपनगराध्यक्ष महोम्मद जफरोद्दीन, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, उपाध्यक्ष शंतनू कैलासे, बाबुराव केंद्रे, चेतन केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आघाडी सरकार बाबत बोलताना चिखलीकर म्हणाले की, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. दोन तीन महिन्यात हे सरकार पाय उतार होऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माझ्यावर आपण सर्वांनी खासदार म्हणून जबाबदारी टाकली आहे. जिह्याचा कारभार पाहत असताना कंधार-लोह्याकडे थोडाफार दुर्लक्ष होत असला तरी मी कंधार-लोह्याला कदापि विसरणार नाही. येथील लोकांनीच मला मोठे केले. याचा मला कधीच विसर पडणार नाही, असे स्पष्ट करून त्यांनी सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक शेख आसिफ, निलेश गौर, राजहंस शहापुरे, मधुकर डांगे, बालाजी पवार, व्यंकट नागलवाड, प्राचार्य किशन डफडे, मा.जि.प. सदस्य चंदनफुले यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.