लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी: आमदार शामसुंदर शिंदे
कंधार ;( प्रतिनिधी)
लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020- 21 वर्षांमधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरड धान्य खरेदी साठी शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून लोहा,व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावात व किमान आधारभूत किमतीत खरेदी होण्यासाठी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता, आ. शामसुंदर शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाच्या दिनांक 17 नोव्हेंबर2020 च्या पत्रकान्वये लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्वारी किमान आधारभूत किमतीत खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार व खरेदी-विक्री संघ लोहा येथे शासनाने ज्वारी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे,
लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया खरेदी विक्री संघ लोहा कार्यालयात सुरू असून कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहान लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना केले आहे. मतदारसंघातील शेतकर्यांनी ज्वारी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू वर्षाचा सातबारा ,होल्डिंग ,आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक ,मोबाईल नंबर आवश्यक आहे, लोहा व कंधार तालुक्यातील शेतकर्यांनी ज्वारी किमान आधारभूत किमतीत खरेदी, कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार व खरेदी विक्री संघ लोहा करणार असून ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ज्वारी 2620 रुपये भाव मिळणार असल्याने लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यात समाधान व आनंद व्यक्त केल्या जात आहे.
लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी शासन दरबारी वेळोवेळी तळमळीने पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न झपाट्याने सोडवण्याचा विक्रम आपल्या आमदारकीच्या एक वर्षपूर्ती च्या काळात आ. शामसुंदर शिंदे यांनी केला असून या अगोदरही कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हमीभाव खरेदी केंद्र आ. शिंदे यांनी मोठ्या प्रयत्नाने मंजूर केले असून, लोहा ,कंधार मतदार संघातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे या अगोदरही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे .लोहा व कंधार येथे किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदी केंद्र सुरू केल्याने लोहा ,कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून , मतदारसंघातील शेतकऱ्यांतून आ. शामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.