लिंबोटी व विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी मतदारसंघातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी पाळ्या मिळणार: आ. शामसुंदर शिंदे

लोहा ;प्रतिनिधी

यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे लिंबोटी मानार प्रकल्प व विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रकल्प 100% भरल्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी शेती मशागत करून काही प्रमाणात रब्बी पेरण्या केलेल्या आहेत, रब्बी हंगामासाठी लिंबोटी मानार प्रकल्प व विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी लोहा ,कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना पाणी पाळ्या मुबलक मिळणार असल्याचे लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले.

खरीप हंगामात अवकाळी पावसाने व अतिवृष्टीने खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाला असल्याने चालू वर्षीच्या रब्बी हंगामासाठी लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून व लिंबोटी मानार प्रकल्पातून समाधान कारक मुबलक पाणी पाळ्या मिळणार असल्याचे आ. शामसुंदर शिंदे यांनी सांगितले. कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळख असलेल्या लोहा ,कंधार चे आ. शामसुंदर शिंदे यांनी लोहा, कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन दरबारी वेळोवेळी तळमळीने पाठपुरावा करून शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले असून, मतदारसंघातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून व लिंबोटी मानार प्रकल्पातून पाणी पाळ्या मुबलक प्रमाणात मिळणार असल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले असल्याने रब्बी हंगामासाठी मतदारसंघातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी पाळ्या मिळणार असल्याने लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांतून आ. शामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *