नांदेड (प्रतिनिधी)
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत तरुण, तडफदार उमेदवार सतीश चव्हाण यांना लोहा-कंधार मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य मिळून देणार असून सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित असल्याचे या वेळी व्यासपीठावर बोलताना लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी स्पष्ट केले .
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदानाला अवघा एक आठवडा राहिला असल्याने पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ काल रविवारी नांदेड येथील बोलाअप येथे लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे , सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारांची बैठक आयोजित केली होती, सतीश चव्हाण हे तरुण तडफदार उमेदवार असून त्यांचे आज पर्यंतचे कार्य अत्यंत गौरवास्पद असुन त्यांनी आजपर्यंत मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोलाचे कार्य केलेले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सतीश चव्हाण यांना लोहा ,कंधार मतदार संघासह नांदेड जिल्ह्यातून प्रचंड मताधिक्य मिळून देण्यासाठी मी आमदार म्हणून कसलीही कसर सोडणार नसून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित असल्याचे यावेळी बोलताना कर्तव्यदक्ष आ. श्यामसुंदर शिंदे यांनी स्पष्ट केले , यावेळी या कार्यक्रमास पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा यथोचित सत्कार आ. शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रावसाहेब पाटील शिंदे ,युवानेते रोहित पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी या कार्यक्रमास लोहा, कंधार मतदार संघासह मुदखेड, नांदेड येथील पदवीधर मतदार सामाजिक अंतराचे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी राष्ट्रवादी भोकर तालुका अध्यक्ष इजि.विश्वंबर पवार,मा. जि. प. सदस्य बालाजी परदेशी,भगवान पवळे सर, माधव पाटील घोरबांड ,सचिन कुदळकर, मोहन कल्याणकर,अनिकेत पाटील,गोपीराज हंबर्डे, अभिजीत पाटील कदम, अशोक सोनकांबळे सह कार्यकर्ते सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.