राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले सूचक संकेत?

पुणे;दि 23

दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.

दि 22 रोजी पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्यांनी लॉकडाऊन बाब सूचक इशारा दिला.

अजित पवार म्हणाले, की “दिवाळीच्या वेळी बरीच गर्दी होती. गणेश चतुर्थी दरम्यानही अशीच परिस्थिती होती. आम्ही संबंधित विभागांशी बोलत आहोत. आम्ही पुढील 8-10 दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ आणि नंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. ” उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “दिवाळीच्या वेळी लोकांनी अशी गर्दी केली जणू या गर्दीमुळे कोरोना मरणार आहे.”

राज्य सरकारने एक नियमावली तयार केली आहे, ज्यामध्ये शिक्षकांची टेस्टिंगसह इतर नियम आहेत. याउलट महापालिका आणि जिल्हा परिषदा निर्णय घेऊ शकतात. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, नागरिक पॅनिक होतील असं मी बोलणार नाही, पाच सहा दिवसांत आढावा घेऊ, असेही पवार म्हणाले.

मास्कची दिल्लीत जास्त कारवाई झाली आहे. आपल्याकडे कमी झाली, दिवाळीत आनंद होता म्हणून कारवाई केली नाही, आता करू, पाच सहा दिवसांत लॉकडाऊन बाबत सगळं चित्र सष्ट होईल. आचारसंहितेमुळे मला अधिकाऱ्यांची बैठक घेता आली नाही. मात्र, लोकांना विनंती आहे, 500 रुपये न भरता मास्क वापरावे, एक तारखेनंतर मी बैठक घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *