मुंबई दि (प्रतिनिधी)
महाआघाडी सरकारचे धोरण जातीवादि असून आंबेडकर विरोधी आहे, त्यामुळे चैत्यभूमिला अभिवादन करण्यास आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने शेकडो भिमानुयायी जाणारच असा इशारा राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने युवाध्यक्ष कनिष्क कांबळे व केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही घटक पक्षाला विश्वासात न घेता स्वतःची मते आंबेडकरी जणांवर लादत आहेत. जे पक्ष या निर्णयाचे समर्थन करत आहेत त्या पक्षाचा सुद्धा आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला आहे.
सर्व प्रार्थनास्थळे उघडली असून सर्वधर्मीयांना दर्शनास परवानगी दिली असताना केवळ आंबेडकरी जनतेच्या अस्मितेशी खेळून त्यांच्या भावना दुखावणार्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे डॉ. माकणीकर यांनी म्हटले आहे.
सदर निर्णय हा आंबेडकरी जनतेवर जाणून बुजून लादण्यात येत असून या दांभिक प्रवृत्तींना डेमोक्रॅटिक आरपीआय थारा देणार नसल्याचा मनोदय कनिष्क कांबळे यांनी बोलून दाखविला.
सहा डीसेम्बर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होय, आणि याच दिनाचे औचित्य साधून देश विदेशातून आपल्या पित्याला अभिवादन करण्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात, मात्र या सरकारने आंबेडकरी भावना पायदळी तुडवीत अभिवादन करण्यास मनाई केली आहे किंतु आरपीआय डेमोक्रॅटिक हा निर्णय ना जुमानता पक्षनेतृत्वात शिवराय फुले शाहू आंबेडकरी शेकडो अनुयायांसह चैत्यभूमी स्थळी अभिवादनास जाणार असल्याचाही गंभीर इशारा देण्यात आला आहे.
आंबेडकरी जनतेच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन करण्यासंबंधीचे निर्देश मागे घ्यावेत व कोरोनावर उपाययोजना करून अभिवादन करण्यास सहकार्य करावे अन्यथा आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानासमोर काळे झंडे दाखवून तिव्र निदर्शने करण्यात येतील.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन निवडुन आलेल्या सरकारणे आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटना व धर्मगुरूंना या बाबत विश्वासात घ्यायला पाहिजे होते परंतु मुजोर झालेले सरकार अन्यायपीडितांना न्याय तर देतच नाही शिवाय अभिवादन करण्यास रोकत आहे ही मुजोरी आरपीआय डेमोक्रॅटिक सहन करणार नसल्याचे मतही पक्षाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी व्यक्त केले आहे.