जागते रहो..!
जागते रहो..! चोर पोलीस हा खेळ आजही बच्चेकंपनीत खूप आवडीने खेळला जातो.चोरांना पोलीस पकडणार…पण केव्हा ?गुन्हा घडल्यानंतरच ना?आर्थिक तस्करींच्या अनेक खळबळजनक बाबी पुढे येत आहेत.बदलत्या काळात विकसित तंत्रांच्याही विश्वासार्हतेला तडे जाताना आपण पाहत आहोत. सोबतचा पोलिसांकडून व्हायरल झालेला हा व्हिडिओ बघा, ATM कार्ड क्रमांक नि पासवर्ड शोधण्याची नवीन शक्कल लुटारूंनी लढवली आहे.चोर किती सराईत झाले आहेत पहा!
बँकेत पैसे ठेवणे आपण सुरक्षित मानतो.अडचणीला पैसे हाती असावेत ही बाब आेळखून ATMही खूपच छान सुविधा हाती आली.तसे याला नाकर्ते बँक कर्मचारीही काही अंशी कारणीभूत असतील म्हणा .किरकोळ कारणाने कायम टोलवाटोलवी केली जाते.बँकेतील कायम असणारी गर्दी काय सांगते?अडवण्यात आपला कोणी हात धरू शकणार नाही,म्हणतात ना यशाला असे तसे पण अपयशाला मात्र संपूर्ण.!नेत्यांच्या हस्तक्षेपाने सहकारी जिल्हा बँकांच्या खेडयातल्या शाखा कमी केल्या गेल्या .
राष्ट्रीयकूत बँकाचे फावले.चढया दरांने बँकिंग सेवा माथी मारल्या जात आहेत यापुढे बँकेत पैसे ठेवायला नि काढायला चार्ज लागणार आहेत तसेच आहेत ते अजून वाढणार आहेत अशा बातम्या आपण नियमितपणे वाचत आहोत.शून्य बँलेस विदयार्थी खात्याचे पासबुक देणे बंद आहे. सर्वसाधारणपणे ग्राहक हित कमी नि बँकिंग धाक जास्त असेच धोरण अनुभवायला मिळत आहे.त्यात सुविधांचा खंडितपणाही असतोच.कधी कधी पासबुक प्रींटसुद्धा वेळेवर मिळत नाही तर कधी खात्यात पैसे जमा झाले याचा मेसेज येत नाही पण ATMमधून पैसे हाती पडण्याआधी विड्रालचा मेसेज मोबाईलवर धडकतो .नशीब आपले..? पण प्रींट पावती मिळत नाही.
याच करकरीला कदरून ATM सुविधा झाली तेव्हापासून पैसे उचलायला सुद्धा अदयाप मी बँकेत गेलो नाही.प्रयत्न करून चेकबुक मिळविले पण अनुभव खूप हास्यास्पद..एकदा एकास चेक दिला तो वठला नाही.परत बँकेत मी स्वत:करता चेक दिला तर KYC च्या नावाने बँकेने मलाच चेक परत दिला.असो. पण मानलं पाहिजे या डोकेबाजांना…ATM मशीनला छेडणे चोरटयांनी थांबवले नाही.
ATMमशीन फोडणे किंवा पळविणे या तर मोठया बाबी पण मायक्रो टेक्निकही वापरल्या जात आहेत.ATMमशीन बाबतची चोरटयांची तंत्रकुशलता चोरीनंतर लक्षात येत आहे.तेव्हा चोरटयाआधी तंत्रदन्यांनी सजगता बाळगणे खूपचआवश्यक झाले आहे कारण आम माणूस लुबाडला जात आहे.ही फसवणूक क्रूर आहे.केसाने गळा कापणारी आहे.
बळी आंबुलगेकर,नांदेड
*****video ****