इडीची पिडा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापा मारला. तसेच प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आणि छापेमारी सुरू केली. त्यावेळी प्रताप सरनाईक परदेशात होते, तिथूनच त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ईडीने ताब्यात घेतले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयचे (ईडी) पथक दाखल झालं आणि छापेमारी सुरु केली. मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरी देखील ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. 

विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक निघून गेलं. त्यांना चौकशीसाठी मुंबईला घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीने  दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आरोप – प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. 
प्रताप सरनाईक मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अमंलबजावणी संचालनालयानाने छापेमारी केली. या कारवाईनंतर शिवसेनाविरुद्ध भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. आमदार प्रताप सरनाईक घरी नसताना धाडी टाकण्यात कसली मर्दानगी?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत, एक महिला तिच्या कार्यालयात नसताना, ती मुंबईबाहेर असताना सर्व लवाजमा, फौजफाटा घेऊन बुलडोझर लावून तिचं कार्यालय पाडण्यात कोणती मर्दानगी होती?, असा प्रतिसवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. मर्दानगीच्या व्याख्या सोयीनुसार बदलतात का?, असा खोचक प्रश्नदेखील त्यांनी राऊत यांना विचारला. राजकीय सूडापोटी अशाप्रकारे कोणतही कारवाई करण्याचं कारण नाही आहे. ईडी स्वतंत्र स्वायत्त आहे, कायद्याने दिलेल्या चौकटीत ते कारवाई करतात. या कारवाईशी भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. जर ईडीकडे काही तक्रारी आल्या असतील, तर त्यांनी केलेली त्यांच्या स्तरावरील ती कार्यालयीन कारवाई आहे. त्याच्याशी भाजपाचा संबंध असण्याचे काही कारण नाही, असं दरेकर म्हणालेत.

प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं. प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे.  शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राच्या राजाकारणात मोठा भूकंप झाला आहे. ईडीने केलेल्या या कारवाईवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजपा नेत्यावर इडी, सीबीआय़ किंवा आयटी ची कारवाई झाली आहे का? विरोधी पक्षाची सरकार असतात तिथेच कारवाई का होते? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

सचिन सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजपा नेत्यावर ईडी, सीबीआय किंवा आयटीची कारवाई झाली का? विरोधी पक्षाची सरकार असतात तिथेच कारवाई का होते? कमलनाथांच्या लोकांवर, गेहलोत सरकार पाडण्यासाठी व कर्नाटक मध्ये तेच झाले! शरद पवार, सुप्रिया ताई व पृथ्वीराज चव्हाण यांना आयटीची नोटीस दिली गेली आहे. भाजपाचा एकही उमेदवार यांना सापडू नये? ज्यांना विरोधी पक्षात असताना चोर म्हणतात ते भाजपात गेल्यावर पवित्र कसे होतात? भाजपाने लोकशाही संकटात आणली आहे हे जनतेने ओळखावं. प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई ही मविआ सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या षडयंत्राचा भाग आहे. पण आम्ही एक आहोत, असेही सावंत यांनी सांगितले आहे. सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप सरकारमधील नेत्यांनी केला. यानंतर आता भाजप नेत्यांशी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. राऊतांच्या या आव्हानाला दरेकरांना प्रतिआव्हान दिलं आहे. ‘इतका वेळ १०० जणांची यादी राऊत यांनी कशासाठी स्वत: जवळ ठेवली? त्यांनी ती यादी लगेच ईडीला द्यावी. ईडी स्वायत्त यंत्रणा आहे. त्यामुळे राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून उगाच मोदी सरकारवर टीका करू नये,’ असं दरेकर म्हणाले. याच मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्या यादीतील सर्वांवर कारवाई होईल असा शब्द दिला आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.

प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला. याबाबत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केलंय की, कंगना राणौत आणि अर्णब प्रकरणी पोलीस दलाचा दुरुपयोग करणारे राज्यातील ठाकरे सरकार ईडीच्या कारवाईवर काय म्हणून कोकलते आहे? हवालाचे घपले झाले असतील तर सगळा मामला समोर येऊ दे. काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे, मात्र ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे, सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई ही भाजपाच्या दबावापोटी केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
ठाकरे सरकारचा काय प्रॉब्लेम आहे? ड्रगवाल्यांवर कारवाई केली तरी यांना त्रास होतो, हवाला आणि काळ पैसा प्रकरणी कारवाई केली तरी खाली वर होतात. मग कारवाई काय फक्त सॉफ्टटार्गेट असलेल्या पत्रकार आणि कंगनासारख्या अभिनेत्रीवर व्हावी का? ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबईपर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असं सांगत आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, ही कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपाविरोधात  बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय, सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपाशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही असंही त्यांनी नमूद केले. पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला, भुजबळ म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, जे स्वप्नरंजन करुन घेत असेल आणि त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांचा आनंद आपण का भंग करावा? भाजपाला सरकार पडण्याची स्वप्ने पडत असतील तर त्यांनी जरूर स्वप्ने पाहावी असा टोला त्यांनी लगावला. तसेच विरोधीपक्षातील एखादा नेता जो  व्यक्ती केंद्रसरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईला राजकीय द्वेषापोटी केलेली कारवाई असल्याचं सांगितलं आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर खळबळजनक आरोप केले आहेत, शिवसेना नेत्यांच्या भष्टाचाराची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी संजय निरुपम यांनी केल्यानं महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. याबाबत संजय निरुपम म्हणाले की, ईडी, सीबीआयसारख्या संस्था राजकीय सुडबुद्धीने कारवाई करत असेल तर त्याची निंदा आहेच. परंतु शिवसेना नेत्यांनी मागील एक दोन दशकात इतका भ्रष्टाचार केलाय, इतकी अवैध संपत्ती जमा केलीय, त्यांची कुठे ना कुठे कोणी चौकशी करत असेल. ठाण्यातील प्रताप सरनाईक यांनी काय केलं माहिती नाही, मात्र शिवसेनेचे अनेक नेते असे आहेत ज्यांनी मोठमोठे भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी व्हायला हवी, या चौकशीला राजकीय द्वेष म्हणून फेटाळू शकत नाही असं त्यांनी सांगितले. तसेच बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हटलं, परंतु त्यांनी कदाचित आजूबाजूच्या शिवसेना नेत्यांना कधी पाहिलं नाही, महापालिका भ्रष्टाचारा अड्डा बनली आहे, या भ्रष्टाचाराची कमाई शिवसेना नेत्यांकडे जाते, याची चौकशी व्हायला हवीच, जर प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित नसेल तर ते फेटाळू शकत नाही असं सांगत निरुपमांनी शिवसेनेवर गंभीर आरोप लावले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्यासारख्या शिवसेनेच्या प्रवक्ते-नेते- आमदार-खासदारांनी पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडल्या, त्यांच्याविरोधात दडपशाही सुरु आहे, ही झुंडशाही आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही शहीद होऊ महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, पण यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडल्या. एका चॅनलविरोधात असो किंवा अन्वय नाईक प्रकरण असो, त्यामुळे काही जणांच्या पोटात ही मळमळ-जळजळ सुरु असावी, असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे. लहान सहान त्रुटी असतील चौकशी होऊ शकते. विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. ज्याच्या लहान मुलाला ईडी घेऊन गेले त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसणार नाही का?, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार असून ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. प्रताप सरनाईक यांनी त्यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरु केली होती. त्यानंतर, २००८ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि २००९ साली लगेचच त्यांना विधानसभेसाठी शिवसेनेनं तिकीट दिलं होतं. प्रताप सरनाईक हे सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहे.
प्रताप सरनाईक विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ठाण्यातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये विहंग ग्रुप सहभागी आहे. तसंच, ठाण्यात विहंग इन हे थ्री स्टार हॉटेल हेदेखील विहंग ग्रुपच्या मालकीचे आहे. ठाण्यात विंहग ग्रुपचा मोठा पसारा आहे. रिअल इस्टेट व्यवसायातही विहंग ग्रुपचा मोठा दबदबा आहे. विहंग शांतीवन, विहंग गार्डन, विहंग गार्डन, रौनक गार्डन, असे अनेक महत्त्वाचे रहिवासी प्रकल्प आहेत.
.

मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे ठाणे येथील घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईनंतर सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेण्यात आले होते. ईडीच्या मुंबईतील कार्यालयात विहंग यांची ५ तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री ८ वाजता त्यांना कार्यालयातून जाण्यास परवानगी देण्यात आली.

टॉप्स ग्रुप्स कंपनीच्या प्रवर्तकांच्या दहाहून अधिक ठिकाणांची झडती घेण्यात आली. बेहिशेबी मालमत्तेसाठी ही चौकशी करण्यात आली. यात काही नेत्यांची नावेही पुढे आली आहेत. त्याआधारे मुंबई आणि ठाण्यातील काही ठिकाणी ईडीने छापे टाकले असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात प्रताप सरनाईक यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. दुपारी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत ही कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र पुर्वेश घरी नव्हते तर विहंग मात्र घरी होते. कारवाईनंतर ईडीच्या पथकाने चौकशीसाठी विहंग यांना ताब्यात घेतले. टॉप्स ग्रुपच्या प्रवर्तकांनी ( नंदा परिवार ) काही कंपन्या खरेदी केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. यातील एका कंपनीच्या संचालक मंडळात विहंग सरनाईक यांचा समावेश आहे. त्याआधारावरच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दुपारी ठाण्यातून त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणले गेले. तिथे सुमारे पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे.

प्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. याशिवाय अभिनेत्री कंगना राणावत विरुद्धही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्यावर ईडीमार्फत झालेल्या कारवाईने मोठे वादळ उठले आहे. शिवसेना सरनाईक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीने छापा टाकला तेव्हा प्रताप सरनाईक घरी नव्हते. सायंकाळी ते मुंबईत माध्यमांना सामोरे गेले. यावेळी या संपूर्ण कारवाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ईडीच्या अशा कारवाईने मी गप्प बसणार नाही. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची कुणी बदनामी करणार असेल तर मी यापुढेही बोलत राहणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मी फासावरही जायला तयार आहे, अशा शब्दांत सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारणा ढवळून निघाले आहे. दरम्यान, ईडीच्या धाडींमुळे माझे तोंड बंद होणार नाही, असे आव्हान देत प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. मात्र ईडीने आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीला विनंती केली आहे. आता नको तर पुढच्या आठवड्यात आपली एकत्रित चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

सध्या मी कोविड-१९ नियमानुसार क्वारेंटाईन आहे. त्यामुळे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केल्याचे वृत्त आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. प्रताप सरनाईक बाहेरुन आल्यामुळे क्वॉरंटाईन होणार असल्यामुळे आज ईडी कार्यालयात हजर राहता येणार नाही, पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलवावे अशा विनंतीचे पत्र ईडीला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

ईडीच्या चौकशीनंतरही प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता.  ईडीनं धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं, होतं. ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.

ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ‘या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार! ईडीचे छापे पडले म्हणून प्रताप सरनाईकचं तोंड बंद होणार नाही. महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे,’ अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली होती. 

‘ईडीच्या लोकांनी माझं कार्यालय, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची सर्व कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. मात्र त्यानंही त्यांचं समाधान झालेलं नाही. मला चौकशीला बोलावल्यास त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी समर्थ आहे. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी त्यांना सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलो नाहीये आणि जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना ठामपणे उत्तर देत असतो,” असंही प्रताप सरनाईक म्हणाले होते. 

मनी लाँड्रिंगच्या संशयावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचानलयाने (ईडी) ने छापे टाकले आहे. आज ईडीकडून प्रताप सरनाईक यांना समन्सही बजावण्यात आला आहे.  त्यांच्यावर होणाऱ्या या कारवाईविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  ‘आता तुम्ही सर्वजणांनी चौकशीला घाबरलं पाहिजे, महाराष्ट्रात सुद्धा सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे ही विसरू नका’ असं म्हणत भाजपला गंभीर इशारा दिला आहे.

‘आम्ही चौकशीला घाबरत नाही, आता तुम्ही सर्वजण चौकशीला घाबरलं पाहिजे, महाराष्ट्रात सुद्धा आमची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे ही विसरू नका, चौकशीला कोण घाबरले हे लवकर कळेल’, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

‘सुडाचे आणि बिनबुडाचे राजकारण सुरू आहे. आज पत्ते तुम्ही पिसताय पण डाव आम्ही उधळून लावू. सध्या जुनी थडगी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, उत्खनन सुरू आहे. ईडीवाले मोहंजोदडो, हडप्पापर्यंत पोहोचले आहेत, काढू द्या काय काढत आहे. देशात दहा हजार कोटी घेऊन पळाले. ज्याची संपत्ती एका वर्षात वाढत आहे याकडे ईडीचे लक्ष नाही, असं म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

‘कंगना रनौतने मुंबईला पाकिस्तान म्हटले होते. त्याचे समर्थन भाजपचे नेते करणार आहे का? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना टोला लगावला. तसंच, ‘मुंबईला उद्या कुणीही पाकव्याप्त काश्मीर असं काही म्हटलं तर मग कुणी असतील, ते  घरी असतील किंवा नसतील कारवाई होईल’  असंही राऊत म्हणाले.

‘प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे की, जो तपास केला जात आहे, त्यात कुटुंबियांचा संबध नाही. मराठी माणसाने उद्योग करणं दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील मराठी लोकांनी व्यापार करू नये आणि करणार असाल तर केंद्रातील संस्थावापरून आम्ही तुम्हाला खत्म करू, असं जर कोणी म्हणत असेल तर हा छाताडावर उभा राहणार महाराष्ट्र आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना  अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने ने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. पण, प्रताप सरनाईक हे कोविड 19 च्या नियमानुसार क्वारंटाइन झाले आहे. ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडून ईडीला विनंती करण्यात आली आहे. मुंबई बाहेरून आल्यामुळे कोविड 19 नियमांनुसार आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन झाले आहे. त्यांनी ईडीला विनंती केली आहे की, विहंग सरनाईक यांच्या पत्नी हायपर टेंन्शनमुळे ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यामुळे विहंग त्याच्या पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे विहंग आणि मला पुढच्या आठवड्यात एकत्र चौकशीसाठी ईडी
ने बोलवावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडी च्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही  प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. त्याचबरोबर सरनाईक यांच्या भागिदाराची माहितीही ईडी कार्यालयात दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची सहा तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सतत ईडीची चर्चा होत असते. वेगवगेळ्या नेत्यांना किंवा उद्योगपतींना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. राज्यातल्या शरद पवार, राज ठाकरेसारख्या नेत्यांना देखील ईडीनं नोटीसा पाठवल्या होत्या. आता सरनाईक हे क्वारंटाइन झाले आहेत, त्यामुळे ईडी काय भूमिका घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२५.११.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *