पुरोहिताना आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे.. निखिल लातूरकर

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांची मागणी

कंधार ; प्रतिनिधी


अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष व ब्रह्म शिखर परिषदेचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांचा आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कंधार येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून पुरोहीत मंदिरात उपजीविकेसाठी मंदिरात पुजा आर्चना करत आहेत प्रोरोहीत काही एका ब्राह्मण जातिचे नाहीत तर या मध्ये मराठा जगम लिंगायत समाजातील लोक मंदिरात पुजा आर्चना करतात पण याच्या मुलांना शिक्षणा साठी व्यापार उद्योग करिता इतर प्ररवा बरोबर महाराष्ट्र सरकारने पुरोहिताना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष व ब्रह्म शिखर परिषदेचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी कंधार येथील सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले,

कंधारच्या साधू महाराज संस्थान मठात दिनांक २४ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा कंधार च्या वतीने निखील लातुरकराचा सत्कार संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार तालुकाध्यक्ष रमेश देशपांडे होते तर प्रमुख पाहूणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज गाजरे , ॲड.सुनिल कोळनूरकर,ॲड.श्यामराव पांगरेकर, भगवान व्यास, नलिनी जोशी,प्रीती वडवळकर,स्वाती कुलकर्णी ,सुरेखा जोशी ,आनंदराव राखे,हेमंत जोशी, आदीची यावेळी उपस्थिती होती.


पुढे बोलताना लातूरकर म्हणाले की कोरोना सारख्या संसर्ग रोगाने थैमान घातल्याने देशात व महाराष्ट्रात लॉकडाँऊन करण्यात आले होते.त्या काळात मंदिरे बंद करण्यात आली होती परंतु महाराष्ट्र सरकारने पुरोहिताना कसल्याच प्रकारची आर्थिक मदत केली नाही ते मंदिर बंद असल्याने उपाशीपोटी काडावे लागले त्यांना आर्थिक मदत देण्यात यावे ब्राह्मण संघाच्या एकुण चौदा मागण्या शासन थरावर आहे ते आम्ही मिळवणारच असे म्हणाले

यावेळी सुत्रसंचलन सौ. भाग्यश्री जोशी ,तर आभार सौ. वर्षा कुरुळेकर यांनी केले.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखेचे पदधिकारी
गजानन महाराज, गजानन पाठक, सुहास दिग्रसकर,संदीप आलेगावकर,अनुप महाराज,आकाश धानोरकर ,अजित महाराज,अरुण पांडे, अवधुत बार्शीकर ,स्नेहा वडवळकर, अपर्णा गाजरे ,ऐश्वर्या महाराज, अरुणा भोसीकर सौ.धानोरकर आदीसह समाज बांधवांनी परीश्रम घेतले .

**** video news****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *