शेख समदानी चाँदसाब यांना पदवीधर मतदारांनी पहिल्या पसंदीचे मतदान देण्याचा घेतला निर्णय

कंधार ;प्रतिनिधी

सत्ताधाऱ्यांना पदवीधर मतदार ना पसंती दाखवत आहेत व भाजपाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यांना तर गत विधान परिषदेतच मतदारांनी ना पसंती दाखवलेली आहे. त्यामुळे आता पर्यायी उमेदवार म्हणून शेख समदानी चाँदसाब यांना मतदारांनी पहिल्या पसंदीचे मतदान देण्याचा निर्णय घेतला आहे.तर तरुणांना स्वजिल्ह्यातच रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी मला संधी द्या असे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शेख समदानी चाँदसाब यांनी आवाहन केले आहे.

सत्ताधाऱ्यांना पदवीधर मतदार ना पसंती दाखवत आहेत व भाजपाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यांना तर गत विधान परिषदेतच मतदारांनी ना पसंती दाखवलेली आहे. त्यामुळे आता पर्यायी उमेदवार म्हणून शेख समदानी चाँदसाब यांना मतदारांनी पहिल्या पसंदीचे मतदान देण्याचा निर्णय मतदारांनी घेतला आहे.तर तरुणांना स्वजिल्ह्यातच रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी मला संधी द्या असे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शेख समदानी चाँदसाब यांनी आवाहन केले आहे.

नांदेड जिल्हाचा भुमिपुत्र आणि शिक्षकांचे मित्र शेख समदानी चाँदसाब हे कंधार तालुक्यातील कंधार शहर ,फुलवळ,नागलगाव,कुरुळा,पानभोसी,बहाद्दरपुरा,आंबुलगा,पेठवडज ,आदीसह तालुक्यातील पदवीधर मतदारांशी यावेळी संवाद साधण्यात आला त्यावेळी शेख समदानी चाँदसाब बोलत होते.

या वेळी शेख समदानी चाँदसाब म्हणाले की महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रा.शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटनेचा मी प्रवक्ता आहे.

माझी जन्म भुमी नांदेड जिल्हा असून शिक्षक चळवळीच्या माध्यमातून मराठवाडा भर अनेक वेळा दौरे करण्याचा योग आला.काही काळ खाजगी शिक्षण संस्थेत व आता जिल्हा परिषदेत कार्यरत असल्याने दोन्ही कर्मचा-याच्या समस्यांची
मला जाणीव आहे.

त्याचबरोबर मराठड्यातील पदवीधर तरुण उच्च शिक्षण घेऊन नोकरी,उद्योग व रोजगारासाठी भटकत आहेत. तथापी पुणे, मुंबई सारख्या महानगरात रोजगारासाठी स्थलांतर करत आहे.त्यासाठी शासन दरबारी प्रयल करुन स्वजिल्ह्यातच रोजगाराच्या संधीउपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

पण राजकीय पक्षाच्या आमदारांनी तसे प्रयत्न केल्याचे
आजपर्यंत तरी दिसून आले नाही. त्या समस्या सोडवण्यासाठी पदवीधरांचा आवाज बनून सभागृहात तोंड उघडले नाही. ते केवळ भांडवलशाहीच्या जोरावर आपले राजकीय हितसंबंध
जपण्यातच धन्यता मानत आले आहेत.

त्यासाठीतच ते आपलं सर्वस्व पणाला लावत
आहेत.पदवीधरांच्या प्रश्नाशी त्यांना काही देणे घेणे नाही.मी मात्र सरकार कोणत्याही पक्षाचे असू दे केवळ पदवीधरांचाच आवाज बणून मी आपली मनोभावे सेवा करीन. अनेक पक्षांची तिकीट नाकारुन मी केवळ तुमचाच प्रतिनिधी होण्यासाठी आणि मतदारांच्या आग्रहाखातर मी अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

माझा विश्वास आपल्यावर आहे.त्या विश्वासावरच मी ही निवडणुक लढवत आहे.मला आपल्या मतदान रुपी आशीर्वादाची गरज
आहे.संकटकाळी आवाज दया मी हजर होईल.तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही हे माझे वचन आहे.
तरी आपण मला या निवडणूकीत पसंती क्र.1 चे अमुल्य मतदान देऊन सेवेचे संधी द्यावी असे आवाहन शेख समदानी चाँदसाब यांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना केले आहे.

*****video news******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *