नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोदजी शेवाळे यांचा दि.२५ रोजी वाढदिवस होता. त्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या तथा आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
आशाताई शामसुंदर शिंदे हे ह्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून संबंध जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत प्रत्येकाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी त्या लक्ष देऊन असतात व कार्यकर्त्याचा वाढदिवस असो किंवा सुख किंवा दुःखाचे कार्यक्रम असोत्या आवर्जून भेटी देत असतात .नांदेड येथे नव्याने सुरु झालेले पोलीस अध्यक्ष श्री शेवाळे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे सह जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे,योगेश पा. नंदनवनकर,अशोक पा. कळकेकर,शिवराज पाटील दापशेडकर उपस्थित होते.