कंधार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा

कंधार ( अॅड.सिद्धार्थ वाघमारे )


येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधारच्या वतीने सकाळी 9.00 वाजता संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करुन  संविधान दिवस साजरा करण्यात आला .

यावेळी  सर्व प्रथम भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विलास कांबळे यांनी संविधानाची प्रस्ताविका उपस्थितांकडुन वदवुन घेतली या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, निलेश गायकवाड, जितेंद्र ढवळे, प्रा.अनिल कारे, नगरसेवक डॉ.दिपक बडवणे, भारतिय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष अॅड. गंगाप्रसाद यन्नावार, आर.एन गायकवाड.आनिल सुर्यवंशी, अॅड सिध्दार्थ वाघमारे पोलिस कर्मचारी पतरे सर, माधव कांबळे, 
, संजय सोनकांबळे, तसेच सिध्दार्थ नगर येथील मित्र मंडळाचे लखन जोंधळे,विशाल कांबळे,निळकंठ कांबळे,विशाल कदम,राकी ढवळे,बालाजी पाटील लुंगारे, गुणाबाई हणमंते अदी उपस्थित होते.
यावेळी 26 11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या  हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *