कंधार दि.26 (प्रतिनिधी)
विविध जाती धर्मात विभागला गेलेला भारतीय समाज राज्य घटनेमुळे एकसंघ बांधला गेल्या मुळेच आपण बंधुभावाने नांदत आहोत भारतीय संविधानामुळे सर्वांना समानतेची व बंधुत्वाची शिकवण मिळाली आहे असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी दि.२६ नोव्हेंबर रोजी कंधार येथे केले.
कंधार शहरातील प्रियदर्शनी उच्च माध्यमिक मुलींच्या विद्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सामाजीक कार्यकत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर, प्राचार्य सौ.राजश्री शिंदे कृष्णाभाऊ भोसीकर,माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजीराव चूकलवाड,गोविंदराव सुर्यवंशी, किरण बडवने,शाळेतील शिक्षक व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली याप्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व 26 /11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजश्री शिंदे यांनी केले यावेळी संजय भोसीकर म्हणाले की भारतीय संविधानामुळे सर्वांना समान हक्क मिळला संविधानामुळे देशात प्रगल्भ लोकशाही नांदत आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांनी भारतीय संविधानाचा आदर करणे व पालन करणे आवश्यक आवश्यक आहे असे संजय भोसीकर म्हणाले.
याप्रसंगी सौ.वर्षाताई भोसीकर यांनी भारतीय संविधानामुळे महिलांना प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असून भारतीय राज्यघटना जगात आदर्श असून या घटनेमुळेच महिलांना मानसन्मानाचे स्थान मिळाले हे सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे शक्य झाले असे सौ. वर्षाताई भोसीकर म्हणाल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जोगे यांनी केले आभार किरण बडवणे यांनी व्यक्त केले.