नांदेड दि 26
आज 26 नोव्हेंबर 2020 हा दिवस दोन कारणांनी भारतीयांसाठी महत्वपूर्ण आहे. त्यातील दुसरे कारण महाराष्ट्र राज्यासाठी इतिहास आहे. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले होते. त्यासाठी संविधान दिन साजरा होतो. तसेच 26/11 या दिवशी अतिरेक्यांनी मुंबई शहरावर हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेतले होते. हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवतांना महाराष्ट्र पोलीस दलाचे अनेक अधिकारी व अनेक जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. दरवर्षी संपुर्ण भारत देश या दोन्ही घटनांना आठवण करतो.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि 26/11 च्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडला. सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. सोबतच 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनाना पुष्पांजली वाहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, मुख्यालयाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर धुमाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, राखीव पोलीस निरिक्षक शहादेव पोकळे, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे, राखीव पोलीस उपनिरिक्षक शिवाजी पाटील, तसेच पोलीस मुख्यालय, नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, बिनतारी संदेश शाखा, जनसंपर्क कार्यालयाचे सुर्यभान कागणे, पोलीस कर्मचारी रेखा इंगळे यांच्यासह असंख्य पोलीस अधिकारी, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.