लोहा -कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी 6 कलमी कार्यक्रम तयार – आमदार श्यामसुंदर शिंदे

शिक्षण, आरोग्य ,सिंचन, कृषी, रोजगार ,दळणवळणाला प्रथम प्राधान्य

लोहा (प्रतिनिधी)


लोहा-कंधार मतदार संघातील किवळा ,लोंढे सांगवी, जोशी सांगवी, वडगाव, ढाकणी या गावांना दि.२६ गुरुवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. श्यामसुंदर शिंदे यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या ,यावेळी आ. शामसुंदर शिंदे यांचे किवळा, लोंढे सांगवी ,जोशी सांगवी, ढाकणी, वडगाव ग्रामस्थांनी तसेच विविध पक्षाच्या व सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आ. शामसुंदर शिंदे यांचे स्वागत करून आमदार शिंदे यांचे समर्थन केले, यावेळी लोंढे सांगवी, वडगाव, जोशी सांगवी, ढाकणी, किवळा येथील ग्रामस्थांच्या विविध अडचणी व समस्या यावेळी आ. शिंदे यांनी जाणून घेतल्या व ग्रामस्थांशी विविध विषयावर सखोल चर्चा केली.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांना बोलताना आ. शिंदे म्हणाले की लोहा, कंधार मतदार संघातील दीनदलित ,पददलितांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून येणाऱ्या काळात दीनदलितांच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत , मतदारसंघातील विधवा, परित्यक्त्या, निराधारांच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील, यापुढे निराधारांची हेळसांड होऊ नये म्हणून मतदारसंघातील सर्कल निहाय निराधारांचे नाव नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी आ. शिंदे यांनी स्पष्ट केले .

लोहा-कंधार मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू असून गेल्या कित्येक दिवसापासून लोहा ,कंधार मतदार संघातील प्रलंबित सिंचन प्रकल्प मी माझ्या काळात पूर्णत्वास नेल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही आ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. लोहा, कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी 6 कलमी आराखडा तयार केला असून मतदारसंघात शिक्षण ,आरोग्य, दळणवळण, कृषी, सिंचन व रोजगारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही यावेळी आ. शिंदे यांनी सांगितले. मतदारसंघातील शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे हित साधता येणार नसून मतदार संघात सिंचन क्षेत्राला प्रथम प्राधान्य देण्यात येऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, रब्बी हंगामासाठी मतदारसंघातील शेतकऱ्यांना किवळा लिफ्ट, लिंबो टी मनार प्रकल्प व विष्णुपुरी प्रकल्पातून मुबलक पाणी पाळ्या मिळणार असल्याचेही यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव वैजाळे, अशोक पा.लोंढे, शहाजी लोंढे,विश्वनाथ लोंढे,बाळू अंनतवाड, बापूराव पाटील,माजी सरपंच बंडू पाटील काळे, ढाकणी सरपंच माधव शिंदे,पंडित पा. शिंदे,शंकर काळे, रतन सर्जे, बापूराव पाटील ,भवर साहेब,बालाजी मोरे,सरपंच माधव पा. शिंदे, पंडित शिंदे ,भगवान चिल पिंपरे, अंकुश वाघमारे ,पुरुषोत्तम चिलपिंपरे, सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *