लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ बचाव कृती समितीची स्थापना करून आंदोलन करण्याचा इशारा
नांदेड ; पिराजी एल. गाडेकर
मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड़ जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली असून यामध्ये समाजाची पुढील भूमिका चळवळ ही आक्रमक होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.
नांदेड़ येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीस महारष्ट्र प्रचारक व्यंकटदादा सोनटके, मानवहित लोकशाही प्रदेश युवक अध्यक्ष भागवत वाघमारे मराठवाड़ा सचिव बाळासाहेब खानजोडे जिल्हाध्यक्ष मालोजी वाघमारे के वाय देवकांबळे,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पिराजी एल गाडेकर,युवा जिल्हा अध्यक्ष संजय बोथिकर,महिला जिल्हा अध्यक्षा सुकमलाताई वाघमारे,युवती जिल्हा अध्यक्षा अनीषा दोडके यांची उपस्थिति होती.
यावेळी बोलताना सचिनभाऊ साठे यांनी या आढावा बैठकी दरम्यान मानवहित लोकशाही पक्षाच्या कार्यक्रत्यांना काही प्रमुख सूचना दिल्या तसेच प्रत्येक जिल्ह्यातील ठिकाणी पक्ष बळकट करण्यासाठी मानवहित लोकशाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सैदेव प्रयत्न शील रहावे आगामी काळात मानवहित लोकशाही पक्षाची वेगळी भूमिका राहील त्या ठिकाणी अपन कोरोनो सारख्या संकटा मध्ये अडकल्या मुळे पक्षाची आक्रमक भूमिका भविष्य काळात निभावनार असल्याचे ही या वेळी त्यानी संगीतले तसेच वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सूचनेचे पालन कार्यक्रत्यानी करावे.
मातंग समाजाला व इतर तत्सम जातिंंना आपला न्याय हक्का साठी राजकीय पटलावर सक्षम होऊण आत्ता हक्काची लढाई करावी लागेल सुमारे ७८ वर्षा पासून ज्या मागण्या समाजाच्या आहेत त्याच मागण्या आज घडीला जशाच्या तशा प्रकारचे आहेत आर्थिक,शैक्षणिक,राजकीय,भौगोलिक,दृष्टिने कमकुवत आहोत त्या आज ही मातंग समाज उपेक्षित आहे त्या साठी माझा मातंग समाज उपेक्षित राहु नयें त्या साठी मि झगडत आहे अगोदरच्या सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पाडले का? प्रत्येक विभागात घोटाले झाले ते विभाग बंद पडले नाही मग अण्णाभाऊ साठे विकास महामण्डळच का बंद पाडले कारण या मधुन मातंग समाजाची आर्थिक उन्नति रोकन्याचा डाव या सरकारचा आहे त्या साठी महामंडळ हे तात्काळ चालू झाले पाहिजे, तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळवा या साठी महारष्ट्रा मधील प्रत्येक आमदारांनी शिफारस पत्र दिले की अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न हा किताब देण्यात यावे परंतु एक दोन आमदार सोडले तर कोणत्याच आमदारांना यानी विधान परिषद मध्ये आवाज उठविला नाही हि विचार करण्या जोगी बाब असल्याचे ही त्यानी संगीतले.
तसेच मातंग समाजाच्या शैक्षणिक विकास होत नसून बार्टीमधून मातंग वर्गाची मुले-मूली, मोठ्या पदावर जात नाहीत त्या मुळे बार्टीच्या धर्तीवर आर्टि ची स्थापना करण्याची गरज आहे. आणि राज्य सरकारला ती स्थापन करावी लागेल तसेच अ ब क ड आरक्षण वर्गीकरण झाले पाहिजे त्याच धर्तीवर मातंग समाजाचा विकास होईल महारष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या प्रत्येक सामाजिक संघटना, राजिकय पक्षची मागणी आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गायराण जमीन अशो किंवा घरकुल प्रश्न अशो मातंग समाजावर होणारे अन्याय अलीकडील काळात सतत वाढत जात आहे तेव्हा राज्य सरकारने यांची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे तसेच या समाजाला न्याय मिळाला पाहिजे या वेळी बोलताना महारष्ट्र राज्याचे मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्य्क्ष सचिन भाऊ साठे यांनी नांदेड़ येथील कार्यकर्ता आढावा बैठकी दरम्यान आपली भूमिका स्पष्ठ केली.
यावेळी राज्य सरकारने आमच्या मागण्याची दखल घेतली पाहिजे अन्यथा शांत व सयमी असलेला मातंग समाजाची आगामी काळात भूमिका आक्रमक राहील असे या वेळी नांदेड़ येथील आढावा बैठकी दरम्यान सांगितले.
या कार्यक्रमाला दत्ता काळे, जिल्हा संपर्क प्रमुख किशन इंगळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष त्रिशला रिगनमोड़े ,हदगाव तालुका अध्यक्ष शिवाजी मात्रे,महिला तालुका अध्यक्ष हदगाव वंदना पोत्रे ,मुखेड महिला तालुका अध्यक्ष,शोशल मीडिया अध्यक्ष चंदु नांदेडकर,संतोष साठे , जयराम वाघमारे ,प्रवीन बसवंते, विपिन वाघमारे, व जिल्ह्यातील सर्व मानवहित लोकशाही पक्षाचे कार्यकर्ते आंदोलक व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.