मुंबई दि (प्रतिनिधी)
झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत होत असलेल्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून विद्यमान मुख्य अभियंता संतोष करंडे याकामी दोषी असल्याचे स्पस्ट होईल त्यासाठी करंडे यांच्या वंशावळी संपत्तीची चौकशी करण्यात यावी अश्या आशयाची तक्रार रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
10 ते 15 वर्षाखाली अधिकृतपणे लॉटरी सोडत होऊन सदनिका वितरित करण्यात आल्या होत्या.
मात्र; त्या अधिकृतरित्या लॉटरी सोडत होऊन ताबा देऊन 15 वर्ष उलटल्यानंतर “त्या” जुन्या सदनिकांना नोटीस देण्यात येऊन कागदपत्र पडताळणी करन्याचे नाटक करून सदनिका गळपाटण्याचे षडयंत्र मुख्य अभियंता संतोष करंडे करत आहे.
नव्याने विना लॉटरी शेकडोंना घुसखोरी करवून करंडे बेबनाव करत असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने केंद्रीय महासचिव व युवा पत्रकार डॉ. राजन माकणीकर आणि राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी केला आहे.
मुख्य अभियंता या प्रकल्पात रुजू झाल्यापासून एकाही झोपडीधारकाला पात्र करण्यात आले नाही. त्याउलट विना लॉटरी सोडत बहुतेकांना शिफ्टिंग दिली गेली आहे. म्हणून सदर प्रकरणी तपास होणे महत्त्वाचे वाटत आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासंबंधी मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उद्योगमंत्री, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC, मा. पोलीस आयुक्त, मा. पोलीस उपायुक्त या पोलीस निरीक्षक, स्थाणीक पोलीस स्टेशनला लिखित स्वरूपात तक्रारी दिल्या आहेत.
तपास निःपक्षपाती नाही झाल्यास ED किंवा CBI कडे प्रकरण वर्ग करण्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला आहे.
सदरचा प्रकल्प हा 1995-96 पासून प्रारंभ झाला असून प्रकल्पात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ज्यांना सदनिका मिळाल्या आहेत त्यांना न छेडता, पात्र असूनही ज्यांना सदनिका नाही मिळाल्या अश्यांना एकत्र करून नवे आंदोलन उभे करून MIDC प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आणण्यास दिसेम्बर मध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती डॉ. माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
याप्रकरणी लवकरच मा. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेट घेणार असून हिवाळी अधिवेशनात प्रश्न उचलून धरणार आहे, त्यामुळे दूध का दूध और पाणी का पाणी सर्व सत्य समोर आणणार असल्याचे वक्तवे पक्षाचे राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.