लग्नाचे आमिष दाखवून संभोग…! हा बलात्कार कसा ….? – डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल

मुंबई दि (प्रतिनिधी) तरुण तरुणी शारीरिक आकर्षणा पोटी एकत्र येतात आणि कालांतराने ते दुरावले जातात, तेंव्हा आकसापोटी तरुणी त्या तरुणावर बलात्काराचा आरोप करते त्यामुळे त्या तरुणाचे संपूर्ण भविष्य धोक्यात येतें असे मत डेमोक्रॅटिक रिपाइंचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

बऱ्याच बाग बगीचा व लव्हर्स पॉईंट वर तरुण आणि तरुणी एकमेकांच्या कवेत चुंबन घेत असलेले पाहण्यात येते, काही दिवसाने या प्रकारामुळे त्यांच्यात वासना जन्म घेते व ते एकमेकांच्या शारीरिक भुकेला बळी पडतात प्रसंगी संभोगाचे अर्धवट ज्ञान असल्यामुळे तरुणी गर्भवती होते, काहींचे आपकार होतात तर काहींना गर्भ खाली करावा लागतो, तर तरुणी व तरुण सुद्धा आत्महत्येकडे प्रवृत्त होतात तर काही शारीरिक व्याधिंनी बळावतात.

आलिंगन पर्यंत ठीक आहे किंतु सार्वजनिक ठिकाणी ही जोडपी एकत्र बसून स्वतः मधली वासना जागृत करतात आणि लोजिंग बोर्डिंग मध्ये वासनांध शरीर एकत्र येऊन शमतात. तरुणी गर्भवती झाली की ती लग्नासाठी मागे लागते, तरुणाला शरीर सुख पाहिजे म्हणून तो खोटी आश्वासने व आणाभाका घेऊन शरीर सुखाचा आनंद घेतही असेल परंतु तरुण लगांसाठी तयार असला तरी तरुणी लग्नासाठी नकार देते असेंही प्रकार दिसून येतात.

वास्तविक आणाभाका दोघेही घेतात, यौन आणि लैंगिक सुख दोघांनी उपभोगलेले असते परंतु काही कालांतराने त्यांच्यात दुरावा निर्माण होतो आणि मन दुभंगली जातात, बऱ्याच प्रकरणात लग्नानंतर जे पाहिजे असत ते आधीच मिळाल्यामुळे त्या नात्यात ते पवित्र्ये आनि आकर्षण नसते आणि घेतलेल्या आणाभाका तुडविल्या जातात.

आंतरजातीय प्रेम संबंध किंवा शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेले संबंध किंवा फक्त वासनेतून निर्माण झालेले संबंधात तृष्णा पूर्ण झाल्यास किंवा बिकट अथवा अवघड परिस्तिथीमुळे लग्न बंधनात अडकता येत नाही या सर्व प्रकारात जबाबदार दोघेही समप्रमानात असतात.

मात्र बहुतांश वेळी या प्रकरणाला स्वतःच्या मर्जीने झालेल्या एक वेळच्या किंवा अनेक वेळच्या संभोगाला बलात्काराचे नाव देऊन तरुणावर आरोप केला जातो आणि त्या तरुणाचे संपूर्ण आयुष्य अंधकारमय होते.

सांगायचे म्हणजे दोघेही तेवढेच जबाबदार असतांना केवळ एकालाच दोषी ठरवून शिक्षा का?
यामुळे या कायद्यात संशोधन होऊन एक नविन कायदा अमलात आला पाहिजे जेणे करून या प्रकरणामधील “बळी का बकरा” तरुणाला कायद्याने संरक्षित करता येईल.

कॅ. श्रावण गायकवाड यांच्या देखरेखीखाली समिती गठीत करून समाजसेवक, कायदे अध्यासक, महाविद्यालयीन विध्यार्थी विद्यार्थिनी, व पालक यांच्या प्रतिक्रिया मागविण्यात आल्याचेही माकणीकर यांनी सांगितले.

एकंदरीत राजीखुषीने अन्यत्र रुम वर जाऊन सलग किंवा एकावेळी सहवास साधला म्हणजे तो बलात्कार ठरू नये खोटी अस्वासने व घेतलेल्या आणाभाका च ठराव्यात.

याबद्दल कायदा पारित करण्यासाठी पक्ष प्रमुख कनिष्क कांबळे यांच्याशी चर्चा करून कॅ. श्रावण गायकवाड, विजय चव्हाण, राजेश पिल्ले, शिवाभाई राठोड, निरंजन दलाल, सय्येद मूनवर, आदींचे शिस्तमंडल कायदेमंत्री रविशंकर प्रसाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपालांशी भेटणार असून या प्रकरणी गंभीर चिंतन आणि मनन होणे गरजेचे असल्याचेही डॉ. माकणीकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *