बळीराम पवार यांची मराठा सेवा संघ नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

कंधार ; प्रतिनिधी

मराठा सेवा संघाचे केंद्रिय सदस्य डॉ .पंजाबराव चव्हाण ,डॉ .गणेश शिंदे,कृषी परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सोपाणराव क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नांदेड येथे दि.२९ नोव्हेंबर रोजी मराठा सेवा संघ नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष पदी बळीराम पवार यांची पुन्हा एखदा फेरनिवड करण्यात आली आहे.

बळीराम पवार हे गेल्या पंधरा वर्षापासुन शाहु फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर चालणाऱ्या मराठा सेवासंघामध्ये निष्ठा पुरक कार्य करत आले आहेत.कंधार लोहा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ .बाबासाहेब आंबेडक,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ,महात्मा बसवेश्वर ,राजश्री शाहु महाराज यासह सर्व महापुरुषांच्या जयंती महोत्सव ते उत्साहने साजरे करतात.

त्याचबरोबर या महापुरुषांच्या जयंतीला महाराष्ट्रातील नामावंत व्याख्याते आणून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करतात.या सर्व सामाजिक कार्याची दखल घेवून बळीराम पवार यांची मराठा सेवा संघ नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या निवडीच्या प्रसंगी मराठा सेवासंघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष उद्धवराव सुर्यवंशी,उत्तर जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर,प्रा.संतोष देवराये,पंडीत कदम,संतोष ठाकरे ,रमेश पवार,शिवाजी जाधव,संकेत पाटील आदीसह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *