कंधार ; प्रतिनिधी
शहरातील मंदीरात कार्तिकी पौर्णिमानिमित्त २ ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६. ३० या वेळेत मंदिरात एकाच वेळी दिपप्रज्वलन करुन आरती करण्यात आली. असल्याचे अ. भा. ब्राम्हण महासंघाचे ग्रामीण जिल्हयाध्यक्ष मनोज गाजरे यांनी सांगितले .
त्रिपुरारी पौर्णिमेची अशी कथा आहे.
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाच्या कठोर तपश्चर्येनंतर ब्रह्माने त्याला वरचा हात दिला जेणेकरून तो शत्रूंना घाबरू नये. त्यानंतर, राक्षस वेडा झाला आणि सर्वांना अस्वस्थ केले. त्यानंतर शंकरने आपली तीन शहरे जाळून त्याचा वध केला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडली असल्याने ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. म्हणून, या दिवशी घराबरोबरच घराबाहेर आणि मंदिरातही दीपांची पूजा केली जाते. नदीत दिवा लावून हा सण साजरा केला जातो.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियम व अटीला अनुसरुन सोशल डिस्टन्स ठेवून कार्यक्रम करण्यात आला.. दरम्यान दिपोत्सवासाठी लागणारे दिवे , वाती , रांगोळी , मेनबत्या , तेल आदी साहित्य अ.भा.ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्नी स्वः खर्चातुन आणुन दिपप्रज्वलन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.भाग्यश्री जोशी,सौ. वर्षा कुरुळेकर, सौ.अर्पणा गाजरे, सौ.रुपाली पाठक, अँड. सौ.स्नेहा देशपांडे, सौ.अरुणा भोसीकर,सौ. प्रज्ञा परळकर, सौ.अरुणा पांगरेकर,सौ.मनिषा पांडे, सौ. अल्का गोलेगावकर, श्रीमती सुरेखा वडवळकर, श्रीमती उषा शास्त्री आदी परिश्रम घेतले . सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम व अटी सांभाळून दिपोत्सव साजरा केला गेला असे आखील भारतीय ब्राम्हण महासंघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज गाजरे यांनी सांगितले.