शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर :प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी केली आत्महत्या. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.

*** आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

काही दिवसांपूर्वी घडला होता हा प्रकार :-

डॉ. शीतल यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं.

कोण होत्या डॉ. शीतल आमटे :-

_ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांची कन्या होत्या. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *