पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा

औरंगाबाद :

औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2020 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा मंजूर करावी.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि.1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून पदवीधर कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी, ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

#nanded #नांदेड #universityelection

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *