आगामी काळात लहुजी शक्ती सेनेची ताकत नांदेड जिल्हात मोठ्या प्रमाणात वाढवणार-प्रदिपभाऊ वाघमारे


नांदेड –

लहुजी शक्ती सेना नांदेड शहर कमिटीच्या वतिने गांधीनगर नांदेड येथे समाजातील सामाजिक कार्यकर्ते व तरुण बांधव यांची महत्वपुर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती,या बैठकीला नागोराव आबंटवार मराठवाडा युवक अध्यक्ष,प्रदिपभाऊ वाघमारे लहुजी शक्ती सेना मुख्य मार्गदर्शक तथा प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष नांदेड,संतोष सुर्यवंशी कोअर कमिटी जिल्हाध्यक्ष, रविकांत पवळे कार्याध्यक्ष, रामभाऊ साबळे सरचिणिस यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत सर्वानुमते महेद्र भठलाडे यांची लहुजी शक्ती सेना नांदेड शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली,या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन समाज बाधंवाना मार्गदर्शन करताना जिल्हात लहुजी शक्ती सेना जोमाणे कामाला लागली आहे असुन अनेक समाज बाधंव संघटनेत मोठ्या प्रमाणात येत आहे,आगामी काळात सरकार दरबारी आपले प्रश्न पुर्ण ताकनीशी माडंण्यासाठी जिल्हात प्रचंड मोठ्या प्रमाणात लहुजी शक्ती सेनेची ताकत वाढविणार असे त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *