फुलवळ ; धोंडीबा बोरगावे
जागतिक अपंग दिनानिमित्त ता. ३ डिसेंबर रोजी कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सागर मल्टिसर्विसेस, पवार कॉम्प्लेक्स बस स्थानक फुलवळ येथे प्रहार जनशक्ती पक्ष कंधार व गावकरी मंडळी च्या वतीने कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामराव मंगनाळे हे उपस्थित होते तर दिव्यांग बांधव गफार शेख , सादख शेख , आखील बिछु , मगदुम शेख , विकास जाधव , विठ्ठल जाधव , हणमंत जाधव , सई हात्ते , मुक्तेश्वर मंगनाळे आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित दिव्यांग बंधू , भगिनींचा पुष्पहार घालून गौरव करण्यात आला त्यामुळे दिव्यांग बांधवानी यावर्षीचा ३% चा ग्राम पंचायत चा निधी मिळाला नाडल्याची खंत व्यक्त केली असता त्यांच्या अडीअडचणी साठी वेळोवेळी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही देण्यात आली.
याप्रसंगी फुलवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे, प्रहार जनशक्ती चे कंधार तालुका अध्यक्ष प्रवीण ऊर्फ सागर मंगनाळे , दैनिक सकाळ वर्तमानपत्राचे बातमीदार धोंडीबा बोरगावे, कामजी मंगनाळे,आनंदराव पवार,नागेश सादलापुरे,उमाकांत मंगनाळे,जिलानी शेख , रमजान शेख , इसाख शेख , संदीप मंगनाळे , दीपक हात्ते व मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते.